"गर्लफ्रेंडने नाकारलं तर...", सध्याच्या पिढीबद्दल ऐश्वर्या नारकर यांचं स्पष्ट मत, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 18:37 IST2025-04-19T18:32:42+5:302025-04-19T18:37:07+5:30
ऐश्वर्या नारकर या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

"गर्लफ्रेंडने नाकारलं तर...", सध्याच्या पिढीबद्दल ऐश्वर्या नारकर यांचं स्पष्ट मत, म्हणाल्या...
Aishwarya Narkar: ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेली अनेक वर्षे त्या अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. दरम्यान, ऐश्वर्या नारकर त्यांच्या अभिनयासह सोशल मीडियावरील फोटो, व्हिडीओंमुळे देखील चर्चेत येतात. त्यात अलिकडेच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सध्याच्या जेन-झी पिढीबद्दल भाष्य केलं आहे.
'सुमन म्युझिक पॉडकास्ट'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली, "आमचे डॉक्टर आहेत पोतनीस त्यांनी सांगितलं होतं की, मुलांना सगळं देण्याची सवय लावू नका. त्यांनी तोंड उघडलं की, सगळं काही देत बसू नका. चॉकलेट हवंय, गाडी हवी असं नाही. पुढे जर त्याच्या गर्लफ्रेंडने नाकारलं तर त्याला तो नकार त्याला पचवता आला पाहिजे. म्हणजेच मुलांना सगळंच मिळेल अशी सवय लावणं चुकीचं आहे. त्यांना ज्या गोष्टी आता हव्यात त्यासाठी नाही म्हणणं हे आपलं कर्तव्य आहे." अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी मुलांच्या बाबतीत हे स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
वर्कफ्रंट
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर अलिकडेच झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत दिसल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेल्या खलनायिकेच्या पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळाली.