'या' अभिनेत्रीच्या मालिकेने पूर्ण केला 100 भागांचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 04:34 PM2019-08-28T16:34:46+5:302019-08-28T16:41:54+5:30

सेटवर तिचा वाढदिवस सुद्धा दणक्यात साजरा करत, कलाकारांनी त्यांच्यातील मैत्री आणि प्रेमाचे बंध उत्तम असल्याचं दाखवून दिलं. 

Marathi saajana serial completed 100 episode | 'या' अभिनेत्रीच्या मालिकेने पूर्ण केला 100 भागांचा टप्पा

'या' अभिनेत्रीच्या मालिकेने पूर्ण केला 100 भागांचा टप्पा

googlenewsNext

'झी युवा' वाहिनीवरील 'साजणा' ही मालिका अल्पावधीतच फार लोकप्रिय झाली. प्रताप आणि रमा यांची ही प्रेमकहाणी हिट झाली आहे. यात संपूर्ण टीमची मेहनत महत्त्वाची होतीच, पण कलाकारांचं एकमेकांप्रती असलेलं प्रेम, हेदेखील याचे एक महत्त्वाचे कारण आहे. नुकतेच या मालिकेचे १०० भाग पूर्ण झाले आहेत. हा आनंदाचा दिवस मालिकेच्या सेटवर साजरा करण्यात आला. याच दिवशी, 'साजणा'मधील रमा, अर्थात पूजा बिरारी हिचा वाढदिवस होता. सेटवर तिचा वाढदिवस सुद्धा दणक्यात साजरा करत, कलाकारांनी त्यांच्यातील मैत्री आणि प्रेमाचे बंध उत्तम असल्याचं दाखवून दिलं. 

'साजणा' या मालिकेतून पूजाने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. चित्रीकरणासाठी घरापासून व कुटुंबापासून तिला लांब राहावे लागते. पण, तिच्या वाढदिवसाचे निमित्त साधून, तिच्या आईवडिलांना सेटवर बोलावून घेण्यात आलं होतं. पूजासाठी, हे यंदाच्या वाढदिवसाला मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट ठरलं. तिचे आईवडील पहिल्यांदाच मालिकेच्या सेटवर आले आणि तेदेखील तिच्या आयुष्यातील खास दिवशी! सहकलाकारांचे हे प्रेम बघून ती फारच खुश झाली. तिच्यासाठी हा वाढदिवस खूपच खास ठरला आहे. वाढदिवसाचे औचित्य असल्याने, केक सुद्धा कापण्यात आला. कुटुंबापासून लांब राहत असूनही, कुटुंबासोबतच राहत असल्याचा अनुभव पूजाला यानिमित्ताने आला. 

मालिकेच्या सेटवर मिळालेल्या या सरप्राईजबद्दल भावना व्यक्त करत असताना पूजा म्हणाली; "वाढदिवसाच्या दिवशी आई-बाबा इथे आहेत ही माझ्यासाठी फार आनंदाची बाब आहे. संपूर्ण टीमचे आभार नक्की कसे मानावेत, हेच मला यावेळी सुचत नाही आहे. अर्थात, हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय वाढदिवस ठरणार आहे. याचं संपूर्ण श्रेय 'साजणा' मालिकेच्या संपूर्ण टीमला जातं."

Web Title: Marathi saajana serial completed 100 episode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.