गावखेड्यात रमली समिधा गुरु; अभिनेत्रीने केली टोपल्या उचलण्यापासून धान्य कांडपण्यापर्यंतची कामे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 15:45 IST2023-07-10T15:45:30+5:302023-07-10T15:45:52+5:30
Samidha Guru: समिधा लवकरच 'कुण्या राजाची तू गं राणी' या मालिकेत झळकणार आहे.

गावखेड्यात रमली समिधा गुरु; अभिनेत्रीने केली टोपल्या उचलण्यापासून धान्य कांडपण्यापर्यंतची कामे
मराठी कलाविश्वातील बऱ्याच अशा अभिनेत्री आहेत ज्या सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असतात. त्यातलंच एक नाव म्हणजे समिधा गुरु (samidha guru). अनेक गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली समिधा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. समिधा कायम चाहत्यांसोबत काही ना काही शेअर करत असते. यात अलिकडेच तिने एक सुरेख व्हिडीओ शेअर केला आहे.
समिधाने इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका गावात असून छान शेणामातीने सारवलेल्या घरात ती काम करताना दिसत आहे. विशेष म्हणजे गावची कामं करत असताना तिने या व्हिडीओला सुरेख असं गाणंही बँकग्राऊंडला दिलं आहे. त्यामुळे समिधा कोणत्या गावी गेली आहे? असा प्रश्न चाहते विचारत आहेत.
समिधा कोणत्याही गावी गेली नसून एका मालिकेचा हा सेट आहे. समिधा लवकरच "कुण्या राजाची ग तू राणी" या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत ती "बाभळी" ही भूमिका साकारणार आहे. दरम्यान, समिधाने या नव्या मालिकेची घोषणा केल्यापासून चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. समिधाने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.