चलते चलते मुझे...., ‘Aai Kuthe Kay Karte’ फेम मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत, पाहा खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 12:56 PM2022-07-31T12:56:28+5:302022-07-31T12:58:14+5:30

Milind Gawali : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेलं एक नाव म्हणजे अनिरूद्ध अर्थात अभिनेते मिलिंद गवळी. मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत.

Marathi serial Aai Kuthe Kay Karte fame Anirudha aka Milind Gawali post | चलते चलते मुझे...., ‘Aai Kuthe Kay Karte’ फेम मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत, पाहा खास व्हिडीओ

चलते चलते मुझे...., ‘Aai Kuthe Kay Karte’ फेम मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत, पाहा खास व्हिडीओ

googlenewsNext

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून घराघरात पोहोचलेलं एक नाव म्हणजे अनिरूद्ध अर्थात अभिनेते मिलिंद गवळी.मिलिंद गवळी (Milind Gawali) हे सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. आपल्या आयुष्यातील अनेक आठवणी, अनेक किस्से, दैनंदिन आयुष्यातील घडामोडी ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या त्यांची अशीच एक पोस्ट व्हायरल होतेय. या पोस्टमध्ये मिलिंद गवळी यांनी सेटवरचा एक सुंदर किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

वाचा, मिलिंद गवळी इन्स्टाग्राम पोस्ट 

चलते चलते... मुझे कई लोग मिले

अगदी लहान मुलांन पासून ते 80 - 85 वर्षाचे लोकं माझ्यातल्या अनिरुद्ध ला भेटायला कुतुहलाने, उत्सुकतेने भेटायला येतात.
सुरुवातीला बोलायला संकोच करतात, एक फोटो मिळेल का ? माझी आई तुमचा कार्यक्रम बघते ,माझी आज्जी तुमचा कार्यक्रम बघते,अशी सुरुवात होते.
मला लोकांना भेटायला आवडतं. म्हणून त्यांचा संकोच,त्यांची भीती घालवण्याचा मी प्रयत्न करतो, एकदा त्यांच्या बद्दल ते बोलायला लागले की मग कळतं, की कोणी डॉक्टर आहे ,मंत्रालयामध्ये डेपोटी कलेक्टर आहे , कोणी IT इंडस्ट्री मधला आहे , कोणाचं हॉटेल ,कोणी वॉचमन ,तर कोणी नर्स, समाजाच्या वेगळ्या वेगळ्या थरातले लोक प्रेमाने येऊन भेटतात , मला खूप छान वाटतं !
काय नातं आहे ?
बोलता-बोलता बर्‍याचश्या लोकांकडून हे ऐकायला मिळतं की तुमचा खूप राग येतो, असं बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर छान smile असतं , राग म्हणजे डोळ्यात तिरस्कार नसतो. its like we love to Hate you.
एक मुलगी म्हणाली , मौजोचा फोटो तुमच्याबरोबर काढायचं. मोजो म्हणजे तिचा लॅब्रेडोर कुत्रा आणि मला कुत्रे अतिशय आवडत असल्यामुळे बराच वेळ छान मोजो शी खेळलो. "आई कुठे काय करते "या सिरीयल मुळे माझं एक वेगळंच नातं लोकांची निर्माण झालाय. हा अनिरुद्ध आपल्या घरातला कोणीतरी आहे ,असं त्यांच्या बोलण्यामध्ये येत आणि तेच मला खूप छान वाटतं. हा आपल्या कुटुंबाचा भाग आहे आणि याला हक्काने आपण भेटावं, याच्याशी बोलावं , असं मला जाणवतं. पूर्वी कॅम्पस campus सीरियल च्या वेळेला “रवि भटनागर” चे कॅरेक्टर character असच लोकप्रिय झालं होतं , त्या वेळेला मी कुठेही गेलो तरी लोक ओळखायचे आणि मी आईबरोबर बाहेर जायचो आणि लोकं माझी सही घ्यायला यायचे , त्यावेळेला माझ्या आई च्या डोळ्यात , आपल्या मुलाबद्दल चा अभिमान मला दिसायचा आणि मग मी ठरवलं आयुष्यात असं काम करायचं , की लोक आपल्यावर प्रेम करतील , मान देतील आणि ते बघून आपलं जवळच्या प्रेमाच्या लोकांना आपला अभिमान वाटेल.
काय गंमत आहे बघा आयुष्यात अशा भूमिका वाट्याला आल्या अनिरुद्ध देशमुख , “ कॅम्पस “चा रवी भटनागर, “परिवर्तन “चा निर्मल देव, “बंधन “मधला निम्मा , जे खलनायक आहेत. तरीसुद्धा लोक एवढे प्रेम करतात .खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि त्या माझ्या वर प्रेम करणाऱ्या असंख्य प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो आणि नक्कीच हे सगळं माझी आई आकाशातून बघतच असणारच.
आशीर्वादाशिवाय हे असं काही घडू शकत नाही.
I am sure this "Divine Intervention"

Web Title: Marathi serial Aai Kuthe Kay Karte fame Anirudha aka Milind Gawali post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.