आई-आप्पांना संकटात टाकून अनिरुद्ध पडणार घराबाहेर; विकणार स्वत:च्या वाट्याची जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 14:31 IST2021-10-21T14:29:55+5:302021-10-21T14:31:00+5:30
Aai Kuthe Kay Karte: संजना आणि अनिरुद्ध त्यांच्या वाट्याला आलेला हिस्सा विकणार असून ते दोघंही देशमुख बंगल्यातून बाहेर पडणार आहे.

आई-आप्पांना संकटात टाकून अनिरुद्ध पडणार घराबाहेर; विकणार स्वत:च्या वाट्याची जागा
छोट्या पडद्यावर सध्या तुफान गाजत असलेल्या 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत अनेक रंजक वळण येत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनिरुद्ध आणि अरुंधती यांचा घटस्फोट झाल्यानंतर देशमुख कुटुंबात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. संजना घरात आल्यामुळे दररोज नवनवीन वाद रंगत आहेत. त्यामुळे आई-आप्पा मुळातच कंटाळले आहेत. हा त्रास कमी होत नाही तोच आता त्यांच्यासमोर एक नवीन संकट उभं राहिलं आहे. विशेष म्हणजे या संकटकाळात अनिरुद्ध आई-आप्पांची साथ सोडणार आहे.
अविनाशवर ओढावलेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी अरुंधती आणि यश त्यांचं राहतं घर गहाण ठेवतात. परंतु, त्यांचं हे गुपित संजना घरातील प्रत्येकासमोर उघड करणार आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबात नवं वादळ उभी राहिलं आहे. या संकटात आप्पा जरी अरुंधतीला साथ देत असले. तरीदेखील घरातील अन्य सदस्य अरुंधतीवर नाराज आहे. यामध्येच संजना अनिरुद्धला घरातून वेगळं होण्याचा सल्ला देते. स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर या नव्या भागाचा प्रोमो शेअर केला आहे.
आई कुठे काय करते : अरुंधतीच्या रिअल लाइफ मुलीविषयी माहितीये का? पाहा तिचे फोटो
संजना-अरुंधतीला विसरा! अनिरुद्धच्या रिअल लाइफ पत्नीला एकदा पाहाच
दरम्यान, संजना आणि अनिरुद्ध त्यांच्या वाट्याला आलेला हिस्सा विकणार असून ते दोघंही देशमुख बंगल्यातून बाहेर पडणार आहे. इतकंच नाही तर या संकटकाळात अनिरुद्ध आई-आप्पांना एकटं सोडणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता 'आई कुठे काय करते' या मालिकेत काय होणार हे येत्या पुढील भागातच प्रेक्षकांना स्पष्ट होणार आहे.