Video: संजना- अरुंधतीमध्ये होणार कडाक्याचं भांडण; अविनाश ठरणार कारणीभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 15:27 IST2021-10-29T15:27:03+5:302021-10-29T15:27:27+5:30
Aai kuthe kay karte: संजना आणि अरुंधती या दोघी घरात एकत्र वावरत असल्या तरीदेखील त्यांच्यात कमालीचे मतभेद आणि मनभेद असल्याचं पाहायला मिळतं.

Video: संजना- अरुंधतीमध्ये होणार कडाक्याचं भांडण; अविनाश ठरणार कारणीभूत
छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते'. ही मालिका खरं तर संजना आणि अरुंधती यांच्यातील वादामुळे जास्त चर्चेत असते. या दोघी घरात एकत्र वावरत असल्या तरीदेखील त्यांच्यात कमालीचे मतभेद आणि मनभेद असल्याचं पाहायला मिळतं. अनिरुद्धच्या आयुष्यात संजना आल्यामुळे अरुंधतीला तिचा संसार मोडावा लागला. त्यामुळे या गोष्टीचा राग घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. त्यातच आता अनिरुद्धदेखील घरातल्यांच्या विरोधात जाऊन संजनाची साथ देत असल्यामुळे सध्या देशमुख कुटुंबात तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच आता अरुंधती आणि संजनामध्ये कडाक्याचं भांडण होणार आहे.
स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर 'आई कुठे काय करते'चा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती आणि संजना भांडण करताना दिसत आहेत. अरुंधतीने अविनाशसाठी घराचे कागदपत्र गहाण टाकल्यामुळे त्यांच्यात हा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
घर विकण्याच्या निर्णयावर अनिरुद्ध ठाम; आई-आप्पांवर केले गंभीर आरोप
संजना-अरुंधतीला विसरा! अनिरुद्धच्या रिअल लाइफ पत्नीला एकदा पाहाच
दरम्यान, अविनाश अर्थिक संकटात सापडल्यामुळे अरुंधती आणि आप्पा या दोघांनी मिळून घराचे कागदपत्र गहाण ठेवले आहेत. ही माहिती संजनाला मिळाल्यानंतर ती घरातल्यांसमोर उघड करते. त्यामुळे अनिरुद्ध आता त्याच्या वाट्याचा हिस्सा विकून हे घर सोडून जाणार आहे. याविषयी त्याने आई-आप्पांशी चर्चा केली असून त्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे या मालिकेत आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.