अप्पी आमची कलेक्टरमध्ये नवा ट्विस्ट, अप्पी जीवनसाथी म्हणून संकल्प की अर्जुन कोणाची करणार निवड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 16:07 IST2022-12-23T15:07:50+5:302022-12-23T16:07:19+5:30
अप्पी आमची कलेक्टर मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. लग्नाच्या भर मंडपात अप्पी वडिलांचं ऐकून कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अप्पी आमची कलेक्टरमध्ये नवा ट्विस्ट, अप्पी जीवनसाथी म्हणून संकल्प की अर्जुन कोणाची करणार निवड?
अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही.पण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे. तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे अप्पी आमची कलेक्टर. तिच्या अभ्यासामध्ये अनेक अडथळे येतात परंतु त्यावर अप्पी जिद्दीनं मात करते. यामध्ये तिला अर्जुनची नकळत साथ मिळत असते. मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे.
ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, तर मागील १६ डिसेंबरच्या भागात पाहिलं अर्जुन अप्पीला एका रोमँटिक सफरीवर घेऊन जातो. पॅराग्लायडिंग करत अर्जुनने अप्पीला प्रपोझ केलं, पण अप्पी अर्जुनशी लग्न करण्यास नकार देते. पण अर्जुन आपल्या म्हणण्यावर ठाम आहे, तो अप्पीला सांगतो माझ्याशिवाय तुझं लग्न होणार नाही.
आता अप्पीच लग्न कोणाशी होणार संकल्प, अर्जुन की ती आपल्या बापूंचं ऐकून शिक्षणासाठी निघून जाईल हे २५ डिसेंबरच्या विशेष भागातच कळेल.