30 वर्षांत पहिल्यांदा मी बाबांना हॉटेलात घेऊन गेलो..., ‘जीव माझा गुंतला’ फेम ‘मल्हार’ची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 12:16 PM2022-05-31T12:16:48+5:302022-05-31T12:18:51+5:30

Marathi Actor Saorabh Rajnish Choughule Post : सौरभची एक पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होतेय. होय, आपल्या बाबासाठी एका हळव्या लेकानं लिहिलेली ही पोस्ट तुम्ही वाचायलाच हवी...!

Marathi Serial Jiv Majha Guntala Fame Malhar Aka Saorabh Choughule post for father | 30 वर्षांत पहिल्यांदा मी बाबांना हॉटेलात घेऊन गेलो..., ‘जीव माझा गुंतला’ फेम ‘मल्हार’ची पोस्ट

30 वर्षांत पहिल्यांदा मी बाबांना हॉटेलात घेऊन गेलो..., ‘जीव माझा गुंतला’ फेम ‘मल्हार’ची पोस्ट

googlenewsNext

Saorabh Rajnish Choughule Post : सध्या मराठी मालिकांची खूपच चलती आहे. अनेक मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाला. या मालिकांमधील कलाकारही कधी नव्हे इतके लोकप्रिय झालेत. ‘जीव माझा गुंतला’  (Jiv Maza Guntala) ही अशीच एक अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका. या मालिकेतील मल्हारला तुम्ही ओळखत असालच. होय, आम्ही बोलतोय ते या मालिकेत मल्हारची भूमिका साकारणारा अभिनेता सौरभ चौगुले (Saorabh Choughule) याच्याबद्दल. तूर्तास सौरभची एक पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होतेय. होय, आपल्या बाबासाठी एका हळव्या लेकानं लिहिलेली ही पोस्ट तुम्ही वाचायलाच हवी. सौरभ व त्याच्या बाबाचं हळवं नातं या पोस्टमधून दिसतं.
अनेक महिन्यानंतर सौरभचे बाबा रजनीश चौगुले त्याला भेटायला आलेत. सौरभ बाबाला बाहेर जेवायला घेऊन गेला. हा अनुभव कसा होता, हे त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे.  वडिलांचा हॉटेलमधील एक फोटोही त्याने शेअर केला आहे.

वाचा, सौरभची पोस्ट 

महिन्यांनी भेटायला आले होते.
30 वर्षातून पहिल्यांदाच मी माझ्या बाबांना हॉटेलात घेऊन गेलो.
म्हणजे मी स्वतः lounge मध्ये टेबल बुक करुन डिनर प्लान केला.
शूट वरून घरी पोहोचे पर्यंत 10.30 झाले. त्यांना pick करून
हॉटेल ला पोहोचल्यावर आम्हा दोघांना खूप awkward होत होतं.
बोलायचं काय?
Order द्यायची काय विचारल तर, "जास्त नको मी काही घेणार नाही."
मग शेवटी एक एक बियर आणि चिकन बिर्याणी ठरलं.
त्यांच्यासाठी अश्या ठिकाणी पहिल्यांदाच होतं आणि मला त्यांच्यासोबत.
10 मिनिट दोघे काही बोललोच नाही. शेवटी मीच इकडचे तिकडचे विषय काढले. पण तेवढेच उत्तर आले.
पुढे काय?
परत तीच शांतता background ला गाणी वाजत होते.
मग बाबांनी shooting बदल काही विचारल मग सगळ सांगीतल. खाणं आलं जेवता जेवता हळू हळू gossip करून झालो.बिर्याणी मात्र उरली ती पार्सल घे म्हणाले Comfortable झालो रे झालो निघायची वेळ झाली बिल मी भरलं, शेवटी बाबा, विचारलच त्यांनी ,"किती झालं बिल?
म्हंटलं, इतकं नाही !
घरी जायला निघालो म्हणाले "उद्या पहाटेची बस आहे.
शांतता होती...
आपल्याला जास्तं बोलता आलं नाही म्हणून थोडं upset होतो.
आता तर background ला गाणी पण नव्हती.
मी म्हणालो, "ठीके मी सोडतो सकाळी.
घर तसं जवळच होत.
पण तितक्यात बाबा सुरू झाले ते पार घराच्या पसार्‍या पासून ते लग्ना पर्यंतचा विषय. ते मला ओरडत होते.
मला हसू येत होतं. कारण अचानक awkwardness गायब झाला होता आणि बर्‍याच महिन्यांनी मी त्यांचा ओरडा खात होतो. सगळ घर आवरून ठेवलं सांगितल आणि ताकीद पण दिली.
अचानक झालेल्या ह्या change over ने भांबावून गेलो होतो पण मज्जा येत होती.
इतक्या महिन्यांनी शिव्या खावून बिर्याणी तर जिरली पण सोबत लग्न विषय कडून dessert ची हौस पण पूर्ण केली.

घरी झोपताना स्वतःलाच म्हणालो, थोडा उशीर केलास सौरभ बाबांन बरोबर अस बाहेर हॉटेल ला जायचा. 30 वर्ष लागली.
त्यांचा फोटो तर काढला पण सोबत फोटो घ्यायचा राहीलाच... I LOVE YOU 

 कलर्स मराठीवरची ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका  प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.   उद्योजक असलेला नायक आणि  साध्या कुटुंबातील रिक्षा चालवणारी नायिका अशी ही मालिकेची कथा प्रेक्षकांना फारच भावली आहे. मालिकेत अंतरा आणि मल्हार या दोघा हट्टी परंतु तितक्याच संवदेशनशील जोडप्याची कथा दाखवली आहे. 

Web Title: Marathi Serial Jiv Majha Guntala Fame Malhar Aka Saorabh Choughule post for father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.