नेहाचं होणार परांजपे वकिलांसोबत लग्न? बंडू काका-काकूंना दिलं वचन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 19:36 IST2021-10-28T19:36:11+5:302021-10-28T19:36:52+5:30
Majhi tujhi reshumgath: यश हळूहळू नेहाच्या प्रेमात पडताना दिसत आहे. मात्र, यश त्याचं प्रेम व्यक्त करण्यापूर्वीच नेहा परांजपे वकिलांशी लग्न करणार?

नेहाचं होणार परांजपे वकिलांसोबत लग्न? बंडू काका-काकूंना दिलं वचन
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. सध्या या मालिकेत रंजक वळण येत असून यश हळूहळू नेहाच्या प्रेमात पडताना दिसत आहे. मात्र, यश त्याचं प्रेम व्यक्त करण्यापूर्वीच नेहा परांजपे वकिलांशी लग्न करणार की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
झी मराठीने नुकताच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बंडू काकू नेहाकडून दुसरं लग्न कर असं वचन घेताना दिसत आहे. नेहादेखील त्यांना वचन देत आहे. विशेष म्हणजे नेहाने परांजपे वकिलांसोबत लग्न करावं यासाठी तिची मनधरणी करा असं नेहाच्या वहिनीने बंडू काकूंना सांगितलं असतं. त्यामुळे आता नेहा परांजपे वकिलांसोबत लग्न करणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, नेहा लग्नाचं वचन देत असताना अचानकपणे यश तिथे पोहोचतो आणि झालेला प्रकार पाहून थक्क होतो. यावेळी नेहाच्या एका बाजूला परांजपे वकील आणि दुसरीकडे यश असे दोघं दिसून येत आहेत. त्यामुळे नेहा या दोघांपैकी कोणाची निवड करणार हे या मालिकेच्या विशेष भागात प्रेक्षकांना समजणार आहे.