Video: बोलो तारारारा..! 'मन झालं बाजिंद'च्या कलाकारांची ऑफ स्क्रीन मस्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 14:09 IST2021-09-26T14:08:44+5:302021-09-26T14:09:41+5:30
Man jhal bajind: या मालिकेतील कलाकारांचं ऑनस्क्रीन जितकं छान बाँडिंग आहे. तशीच त्यांची मैत्री ऑफस्क्रीनदेखील आहे.

Video: बोलो तारारारा..! 'मन झालं बाजिंद'च्या कलाकारांची ऑफ स्क्रीन मस्ती
झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच सुरु झालेली मालिका म्हणजे 'मन झालं बाजिंद'. अल्पावधीत ही मालिका लोकप्रिय झाली असून तिला सध्या प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सध्या ही मालिका यशाच्या शिखरावर आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील कलाकारांचं ऑनस्क्रीन जितकं छान बाँडिंग आहे. तशीच त्यांची मैत्री ऑफस्क्रीनदेखील आहे. सध्या सोशल मीडियावर या मालिकेतील काही कलाकारांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्यातील मैत्री स्पष्टपणे दिसून येत आहे.
झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर मन झालं बाजिंद या मालिकेतील कलाकारांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये हे कलाकार ऑफस्क्रीन कशी मज्जामस्ती करतात हे दाखवण्यात आलं आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन बोलो तारारारा या गाण्यावर डान्स करत आहेत. विशेष म्हणजे त्यांना या डान्समध्ये मालिकेतील सहकलाकारांनीही साथ दिली आहे. त्यामुळे मालिकेतील जवळपास अर्धी टीम डान्स करण्यात रमल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या मालिकेत वैभव चव्हाण आणि श्वेता राजन मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केलेले असून वाघोबा प्रॉडक्शन यांनी या मालिकेच्या निर्मीतीची धुरा सांभाळली आहे.