राया-कृष्णाचं लुटूपुटूचं भांडण; हळूहळू वाढतीये संसाराची गोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 05:00 PM2021-11-04T17:00:00+5:302021-11-04T17:00:00+5:30

Man Jhala Bajind: हळूहळू राया-कृष्णाचं मनं जुळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आता त्यांच्या लुटूपुटूची भांडण होत असून संसाराची गोडी वाढताना दिसत आहे.

marathi serial Man Jhala Bajind raya and krishna start friendship | राया-कृष्णाचं लुटूपुटूचं भांडण; हळूहळू वाढतीये संसाराची गोडी

राया-कृष्णाचं लुटूपुटूचं भांडण; हळूहळू वाढतीये संसाराची गोडी

googlenewsNext

'मन झालं बाजिंद' (Man Jhala Bajind)  या मालिकेला सध्या नवीन वळणं लागल्याचं पाहायला मिळत आहे. सतत एकमेकांसोबत भांडण करणारे राया आणि कृष्णा आता नवरा-बायको म्हणून एकत्र नांदू लागले आहेत. खरं पाहता दोघांच्याही मनाविरुद्ध हे लग्न झालं आहे. मात्र, कुटुंबातील इतरांसाठी ते आनंदाने संसार करत असल्याचं भासवत आहेत. यामध्येच हे नाटक करत असताना दोघंही एकमेकांना समजू लागले आहेत. त्यामुळे हळूहळू त्यांची मनं जुळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आता त्यांच्या लुटूपुटूची भांडण होत असून संसाराची गोडी वाढताना दिसत आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये राया कृष्णाचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या परिस्थितीमध्ये या दोघांचं लग्न झालं. त्यावरुन आपण फक्त बेडरुमबाहेर नवरा- बायको असून या खोलीच्या आत आपलं कोणतंही नातं नसेल असं रायाने कृष्णाला सांगितलं होतं. त्यामुळे हे दोघंही घरातल्यांसमोर पती-पत्नी असल्यासारखं वावरतात.

शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये जर आपलं नवरा बायकोचं नातं नाही तर सगळ्यांसमोर खोटं का वागायचं असा प्रश्न कृष्णा विचारते. त्यावर निदान आज तरी हे नाटक कर असं राया तिला सांगतो. परंतु, कृष्णा ऐकत नसल्यामुळे तो तिला थेट उचलतो आणि खोलीच्या बाहेर नेतो. 

दरम्यान, राया आणि कृष्णा यांच्यातील अंतर कमी होत असून आता त्यांच्यात मैत्री होताना दिसत आहे. त्यामुळे या मैत्रीचं प्रेमात कधी रुपांतर होणार हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
 

Web Title: marathi serial Man Jhala Bajind raya and krishna start friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.