चिमुकल्या मायराचा जबरा फॅन; रांगोळीतून रेखाटलं सुंदर चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 02:10 PM2021-09-23T14:10:21+5:302021-09-23T14:11:37+5:30

Mazhi Tuzhi Reshimgaath: या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत झळकले आहेत. मात्र, या दोघांव्यतिरिक्त प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतीये ती कलाकार म्हणजे परी.

marathi serial Mazhi Tuzhi Reshimgaath mayar and bappa drawing done by omkar nalavade | चिमुकल्या मायराचा जबरा फॅन; रांगोळीतून रेखाटलं सुंदर चित्र

चिमुकल्या मायराचा जबरा फॅन; रांगोळीतून रेखाटलं सुंदर चित्र

googlenewsNext
ठळक मुद्देमायरासोबत बाप्पा अशी ही रांगोळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'.  ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून सध्या लोकप्रिय मालिकांच्या यादीत प्रथम स्थानावर असल्याचं पाहायला मिळतं. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत झळकले आहेत. मात्र, या दोघांव्यतिरिक्त प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतीये ती कलाकार म्हणजे परी. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मायरा वायकुळ ही बालकालाकार परीची भूमिका साकारत असून दिवसेंदिवस ती लोकप्रिय होत आहे. इतकंच नाही तर तिच्या फॅनफॉलोअर्समध्ये तुफान वाढ होत असून एका चाहत्याने तिच्यासाठी खास रांगोळी रेखाटली आहे.

'आहे परी तर डोन्ट वरी' असं म्हणत आपल्या निरागस अभिनयाने मायराने प्रेक्षकांचं टेन्शन दूर करत त्यांच्या मनात एक अढळ स्थान बनवलं आहे. मालिकेतील तिचा हा निरागसपणा प्रेक्षकांना भावतोय. त्यामुळेच परीच्या एका चाहत्याने तिच्यासाठी खास सरप्राइज दिलं आहे.

नुकतीच एका चाहत्याने मायरासोबत गणपती बाप्पा अशी थ्रीडी रांगोळी काढली आहे. ओमकार नलावडे असं या आर्टिस्टचं नाव आहे. ओमकारने कलेच्या अधिपतीला कलेतून वंदन केलं. 

अशी ही बनवाबनवी: त्याकाळी चित्रपटाचं तिकीट किती रुपये होतं माहितीये का?

दरम्यान, मायरासोबत बाप्पा अशी ही रांगोळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. तसंच  या रांगोळीचा व्हिडिओ झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Web Title: marathi serial Mazhi Tuzhi Reshimgaath mayar and bappa drawing done by omkar nalavade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.