‘राजा राणीची गं जोडी’ फेम या अभिनेत्रीचा थाटामाटात पार पडला विवाह सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 01:40 PM2022-04-01T13:40:40+5:302022-04-01T16:12:05+5:30

'राजा राणीची गं' जोडी मालिकेतील अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे..

Marathi serial 'Raja Ranichi Gam Jodi' fame actress tie a knot | ‘राजा राणीची गं जोडी’ फेम या अभिनेत्रीचा थाटामाटात पार पडला विवाह सोहळा

‘राजा राणीची गं जोडी’ फेम या अभिनेत्रीचा थाटामाटात पार पडला विवाह सोहळा

googlenewsNext

कलर्स मराठीवरील राजा राणीची गं जोडी (Raja ranichi ga jodi) मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिया मालिका आहे. ही मालिक सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत नुकतीच जादू नावाच्या बालकलाकाराची एंट्री झाली आहे. मालिकेत जादूचा बिनधास्तपणा प्रेक्षकांना खूप भावला आहे. रणजित आणि संजू जादूला दत्तक घेण्याचा विचार करतायेत. दरम्यान याच मालिकेसंदर्भात एक बातमी आहे.  या मालिकेतील एक अभिनेत्री लग्नगाठ बांधली आहे.

 ही अभिनेत्री कोण?, असा प्रश्न तुम्हाला पडाल असेल तर ही अभिनेत्री  अंकिता निक्रड (Ankita Nikrad). अंकिताने या मालिकेत अपर्णाची भूमिका साकारली होती.  २८ मार्च २०२२ रोजी  मोठ्या थाटात अंकिता आणि ज्ञानेश भुकेले यांचा लग्नाचा सोहळा पार पडला. . लग्नाआधी अंकिताने मेहेंदी सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

कोण आहे अंकिताचा पती?
 ज्ञानेश भुकेले हा मूळचा कोल्हापूरचा परंतु त्याचे कुटुंब पुण्यात वास्तव्यास आहे. ज्ञानेश हा लेखक, पत्रकार आणि व्याख्याता म्हणून ओळखला जातो. ज्ञान मीडिया या संस्थेचा तो संस्थापक आहे. 

अंकिताने दहावी नंतर 3 वर्षे डिप्लोमा इंजिनिअरिंगचा अभ्यास केला होता. शेवटच्या वर्षात शिकत असताना अंकिता नाटकांकळे वळली. अभिनयात ती इतकी रमली की,इंजिनिअरिंगचं शिक्षण अर्धवट सोडत तिने पुण्यातील ललित कला केंद्र मध्ये प्रवेश मिळवला. इथूनच तिचा रंगभूमीवरचा खरा प्रवास सुरु झाला. तीन वर्षे नाट्यशास्त्र विषयाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर मुंबईच्या लोककला विभागात तिने अ‍ॅडमिशन घेतले. सन मराठी या वाहिनीवरील सुंदरी या आणखी एका मालिकेत अंकिता महत्वाची भूमिका साकारताना दिसतेय.
 

Web Title: Marathi serial 'Raja Ranichi Gam Jodi' fame actress tie a knot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.