दोन्ही मुलींना एकत्र पाहून दीपा भावूक; दीपिकाचं सत्य येणार का समोर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 15:45 IST2021-11-03T15:45:00+5:302021-11-03T15:45:00+5:30
Rang Majha Vegla: दीपिका ही आपलीच मुलगी आहे हे सत्य अद्याप दीपापुढे आलेलं नाही. त्यामुळे दीपिकाला पाहिल्यावर तिला सतत तिच्या गमावलेल्या बाळाची आठवण येते.

दोन्ही मुलींना एकत्र पाहून दीपा भावूक; दीपिकाचं सत्य येणार का समोर?
उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे बऱ्याच महिन्यांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मालिका म्हणजे रंग माझा वेगळा (Rang Majha Vegla). दीपा आणि कार्तिक या दोघांच्या नात्यात वितुष्ट आल्यामुळे त्यांनी स्वतंत्र वाटा निवडल्या. परंतु, या मधल्या काळात दोघांच्याही जीवनात अनेक घटना घडून गेल्या आहेत. दीपा- कार्तिकच्या मुली मोठ्या होऊ लागल्या आहेत. आणि, या दोघी जणी आपल्या आई-वडिलांविषयी विचारत आहेत. यामध्येच कार्तिकी आणि दीपिका यांच्यात छान गट्टी जमली असून दोघांना एकत्र खेळताना पाहून दीपाचे डोळे पाणावणार आहेत.
कार्तिकी आणि दीपिका एकमेकींच्या छान मैत्रिणी झाल्या असून लवकरच कार्तिकी दीपिकाच्या शाळेत जाऊ लागणार आहे. इतकंच नाही तर या दोघी जणी सतत एकमेकींसोबत सख्ख्या बहिणींप्रमाणे वावरत आहेत. त्यामुळे दीपाला तिच्या दुसऱ्या बाळाची प्रचंड आठवण येत आहे.
दीपा-कार्तिक लवकरच येणार एकत्र; इनामदारांच्या घरात होणार दीपाचा गृहप्रवेश?
दीपिका ही आपलीच मुलगी आहे हे सत्य अद्याप दीपापुढे आलेलं नाही. त्यामुळे दीपिकाला पाहिल्यावर तिला सतत तिच्या गमावलेल्या बाळाची आठवण येते. माझं दुसरं बाळ असतं तर तेदेखील असंच कार्तिकीसोबत खेळत असतं असं सतत तिला वाटतं. त्यामुळे कार्तिकी- दीपिकाला पाहून दीपाचे डोळे पाणावतात.
दरम्यान, या दिवाळीमध्ये दीपा आणि सौंदर्या इनामदार एकमेकींच्या समोर येणार आहे. त्यामुळे सौंदर्या इनामदारला दीपाचा पत्ता लागल्यावर त्या दीपाला घरी घेऊन येण्यास यशस्वी ठरतील की नाही हे पाहणं औत्सुक्याचं आहे.