प्रेम व्यक्त करण्यासाठी लतिकाने घेतला दारुचा आधार; काय असेल अभिमन्युचं उत्तर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 13:30 IST2021-11-05T13:30:00+5:302021-11-05T13:30:00+5:30
Sundara manamadhe bharli: लतिका अभिमन्युच्या प्रेमात पडली आहे. मात्र, अभ्यासमोर हे प्रेम कसं व्यक्त करावं हे तिला सुचत नाही.

प्रेम व्यक्त करण्यासाठी लतिकाने घेतला दारुचा आधार; काय असेल अभिमन्युचं उत्तर?
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'सुंदरा मनामध्ये भरली'( sundara mann madhe bharli). या मालिकेत अभिमन्यु आणि लतिका यांच्या आयुष्यात अनेक चढउतार येत आहेत. एकीकडे या दोघांचा घटस्फोट होणार आहे. परंतु, या दोघांच्याही मनात एकमेकांविषयी प्रचंड प्रेम आणि आदर आहे. यामध्येच आता लतिका अभिमन्युच्या प्रेमात पडली आहे. मात्र, अभ्यासमोर हे प्रेम कसं व्यक्त करावं हे तिला सुचत नाही. त्यामुळे ती दारुचा आधार घेत तिच्या मनातील भाव सांगणार असल्याचं म्हटलं जात आहे.
कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये लतिका दारू पितांना दिसत आहे. इतकंच नाही तर अभिमन्यु आल्यानंतर ती दारुच्या नशेत त्याच्यावर प्रेम असल्याचं सांगून टाकते. त्यामुळे अभिमन्युदेखील मनातल्या मनात खूश होतो.
"अभड्या, तुला कडकडून मिठी मारावीशी वाटते. आणि सांगावं, माझं तुझ्यावर लईईई प्रेम आहे", असं लतिका दारुच्या नशेत बोलते. परंतु, लतिकाने न कळत तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, लतिकाने जरी हे दारुच्या नशेत तिचं प्रेम व्यक्त केलं असलं. तरीदेखील ती खरोखर अभिमन्युसमोर येऊन तिच्या मनातील भाव सांगेल का? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तसंच अभिमन्यु तिच्या या वागण्यावर कसं रिअॅक्ट करेल हादेखील प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे आता या मालिकेत नेमकं काय होणार. ही मालिका पुढे कुठल्या वळणावर जाणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.