स्वप्नपूर्ती! 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अक्षर कोठारीने खरेदी केली महागडी कार, शेअर केला व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 08:56 IST2025-01-28T08:53:35+5:302025-01-28T08:56:43+5:30

अक्षर कोठारी (Akshar Kothari) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो.

marathi television actor lakshmichya pavalani fame akshar kothari buy new jeep compass model s car shared video | स्वप्नपूर्ती! 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अक्षर कोठारीने खरेदी केली महागडी कार, शेअर केला व्हिडीओ 

स्वप्नपूर्ती! 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अक्षर कोठारीने खरेदी केली महागडी कार, शेअर केला व्हिडीओ 

Akshar Kothari: अक्षर कोठारी (Akshar Kothari) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. 'आराधना', 'छोटी मालकीण', 'स्वाभिमान', तसेच 'चाहूल' या मालिकांमधून तो घराघरात पोहोचला. अक्षर कोठारी सध्या  स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' (lakshmichya Pavlani)  या मालिकेत आपल्याला मुख्य भूमिकेत पाहायला मिळतोय. या मालिकेमध्ये तो साकारत असलेली अद्वैत चांदेकर नावाची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली आहे. सध्या अक्षरची सोशल मीडियावर एका खास कारणामुळे चर्चा होते आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अभिनेत्याने नवीन गाडी खरेदी केली आहे. स्वत: ची ड्रीम कार खरेदी करुन त्याने आपलं स्वप्न पूर्ण केलंय. 


नुकतीच अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर केला आहे. या  व्हिडीओच्या माध्यमातून त्याने आपल्या नव्या गाडीची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. अक्षर कोठारीने  'Jeep Compass Model S' तब्बल ३२ लाख किंमतीची कार त्याने खरेदी केली आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून मराठी कलाकारांसह चाहत्यांनी सुद्धा शुभेच्छा देत त्याचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, अक्षय कोठारीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओवर कमेंट करत अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणते, "वेलकम टू द फॅमिली..., जीप कंपास... गुड चॉईस." तर "भाई, अभिनंदन....!" असं म्हणत अभिनेता आशुतोष गोखलेने या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय अभिषेक रहाळकर, अपूर्वा नेमळेकर, मंदार जाधव आणि हर्षद अतकरी या कलाकारांनी सुद्धा अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव करत कमेंटच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Web Title: marathi television actor lakshmichya pavalani fame akshar kothari buy new jeep compass model s car shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.