शुभमंगल सावधान! 'मन धागा धागा जोडते नवा' फेम अभिषेक रहाळकर अडकला विवाहबंधनात, फोटो चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 17:11 IST2025-01-24T17:10:30+5:302025-01-24T17:11:59+5:30
सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.

शुभमंगल सावधान! 'मन धागा धागा जोडते नवा' फेम अभिषेक रहाळकर अडकला विवाहबंधनात, फोटो चर्चेत
Abhishek Rahalkar Wedding Photo Viral: सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. एकापाठोपाठ एक अनेक कलाकार त्यांच्या लग्नाच्या बातम्या देत आहेत. अशातच आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याने लग्नगाठ बांधली आहे. हा अभिनेता म्हणजे अभिषेक रहाळकर. स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता अभिषेक रहाळकर घराघरात पोहोचला. या मालिकेत त्याने साकारलेलं सार्थक नावाचं पात्र आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. दरम्यान, नुकतेच सोशल मीडियावर अभिनेत्याच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले होते. या फोटोंद्वारे अभिनेत्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला. दरम्यान, सोशल मीडियावर अभिषेकच्या साखरपुड्याची चर्चा होत असताना आता त्याच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
अभिषेकच्या साखरपुड्यातील इनसाइड फोटो ‘दुर्गा’ मालिकेतील अभिनेत्री रुमानी खरेने शेअर केला होता. आता तिने लग्नाचे फोटो देखील इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केल्याचे पाहायला मिळतायत. याशिवाय अभिज्ञा भावे, दिव्या पुगावकर यांनी देखील सोशल मीडियावर अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.'मन धागा धागा जोडते' नवा ही मालिकेने अगदी काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यातील सार्थक राजाध्यक्ष या मुख्य भूमिकेत झळकला अभिषेकने प्रेक्षकांना आपलंसं केलं होतं. नुकतेच त्याच्या रिंग सेरेमनीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर आता लग्नाचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे अभिषेकचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
अभिषेक आणि रुमानी 'तू तेव्हा तशी' मालिकेत झळकले होते. यानंतर अभिषेक 'मन धागा धागा जोडते नवा' मध्ये दिसला. अभिषेकने मात्र अद्याप त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ही गुडन्यूज चाहत्यांना दिलेली नाही. त्यामुळे अभिषेकच्या खऱ्या आयुष्यातली आनंदी म्हणजे कृतिका नक्की आहे तरी कोण? ती त्याला कुठे भेटली हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.