सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा दुबई दौरा; आई-बाबांसोबत स्पेंड करतोय क्वॉलिटी टाइम, फोटो Viral
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 13:38 IST2024-07-25T13:35:56+5:302024-07-25T13:38:39+5:30
वेगवेगळ्या मराठी मालिका तसेच नाटकांमध्ये काम करत अभिनेता रोहन गुजर प्रकाशझोतात आला.

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा दुबई दौरा; आई-बाबांसोबत स्पेंड करतोय क्वॉलिटी टाइम, फोटो Viral
Rohan Gujar Viral Post : वेगवेगळ्या मराठी मालिका तसेच नाटकांमध्ये काम करत अभिनेता रोहन गुजर प्रकाशझोतात आला. 'होणार सुन मी या घरची' या मालिकेत त्याने साकारलेली पिंट्याची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली. दरम्यान, अभिनेता सध्या सन मराठीवरील 'नवी जन्मेन मी' या मालिकेत सुजित नावाचं पात्र साकारत आहे.अशातच अभिनेता रोहन गुजर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. आपल्या कामातून थोडा ब्रेक घेत रोहन परदेशात सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लूटताना दिसतोय.
रोहन सोशल मीडियावरही कमालीचा सक्रिय असल्याचा पाहायला मिळतो. नुकतेच त्याने स्वत:च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सध्या रोहन आपल्या कुटुंबासोबत परदेशात क्वॉलिटी टाइम स्पेंड करताना दिसतो आहे. फोटोंमध्ये रोहन यावेळी त्याची पत्नी स्नेहल तसेच आई-बाबांसोबत दिसतोय. दुबई येथे गुजर कुटुंबीय त्यांचा व्हेकेशन एन्जॉय करत आहेत.
सोशल मीडियावर अभिनेत्याचे हे फोटोज तुफान व्हायरल होत आहेत. या पोस्टवर रोहन गुजरने "कुटुंब- पहिला परदेश दौरा" असं कॅप्शन दिलं आहे. रोहनच्या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे.
'बन मस्का', 'लव्ह लग्न लोचा', 'सांग तू आहेस का?' अशा लोकप्रिय मालिकांमधून रोहन महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसला. रोहनने मालिका, नाटक तसेच वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.