"चॉकलेट केक अन्..." शशांक-प्रियांकाच्या लग्नाचा वाढदिवस लाडक्या लेकाने असा बनवला खास; पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2024 11:37 AM2024-12-05T11:37:31+5:302024-12-05T11:39:56+5:30
शशांक केतकर (Shashank Ketkar) हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे.
Shashank Ketkar: शशांक केतकर (Shashank Ketkar) हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. वेगवेगळ्या मालिका, चित्रपट तसेच नाटकांमधून काम करत त्याने आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला. सध्या शशांक स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळतो आहे. शशांक त्याच्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असतो. सोशल मीडियावरही तो बेधडकपणे आपलं मत मांडताना दिसतो. काल ४ डिसेंबरच्या दिवशी अभिनेत्याने त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. शशांक आणि प्रियांकाच्या सुखी संसाराला ७ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने सोशल मीडियावर खास पोस्ट करत त्याने लाडक्या बायकोला शुभेच्छाही दिल्या. परंतु कालचा दिवस शशांक आणि प्रियांकासाठी त्यांच्या मुलाने खास बनवला. याचा व्हिडीओ शशांकने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
शशांक केतकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय, एका टेबलवर केक ठेवलेला असून त्यावर प्रिशा असं नाव लिहलेलं आहे. या व्हिडीओमध्ये शशांकच्या मुलाचे बोबडे बोल ऐकू येत आहेत. त्यावेळी तो म्हणतो, "हे आई-बाबा आहेत. त्यांची अॅनिव्हर्सरी आहे, म्हणून हा चॉकलेट केक त्यांच्यासाठी आणला आहे." सोशल मीडियावर अभिनेत्याने हा व्हिडीओ पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहलंय की, "आमची अॅनिव्हर्सरी या पेक्षा गोड नोटवर संपूच शकत नाही! आम्हा दोघांनाही भरभरून शुभेच्छा आणि प्रेम देणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार."
दरम्यान, २०१७ मध्ये शशांक केतकरने प्रियांका ढवळेसोबत लग्नगाठ बांधली. शशांक-प्रियांकाच्या या सुखी संसाराला ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. शशांक केतकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओवर मराठी कलाकार मंडळींनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.