शाल्व-श्रेयाची लगीनघाई! थाटात पार पडला मेहंदी सोहळा, फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 10:42 IST2024-12-13T10:39:22+5:302024-12-13T10:42:15+5:30
मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

शाल्व-श्रेयाची लगीनघाई! थाटात पार पडला मेहंदी सोहळा, फोटो आले समोर
Shalva Kinajawadekar: मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अलिकडेच अनेक कलाकार लग्नबंधनात अडकून त्यांनी आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. किरण-वैष्णवी, हेमल इंगळे, शिवानी-अंबर या कलाकारांच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. याशिवाय आता छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेल्या आणखी अभिनेत्याचा नुकताच मेहंदी सोहळा पार पडला आहे. हा अभिनेता म्हणजे शाल्व किंजवडेकर (Shalva Kinajawadekar) . झी मराठी वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि 'शिवा' या मालिकेतून अभिनेता शाल्व किंजवडेकर घराघरात पोहोचला. या मालिकेतील ओमकारच्या भूमिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. अभिनयाबरोबरच शाल्व त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आता शाल्वच्या घरी लगीनघाई सुरू आहे. लवकरच तो लग्नबंधनात अडकणार आहे.
सोशल मीडियावर शाल्व आणि श्रेयाच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. शाल्व किंजवडेकरची होणारी पत्नी श्रेया डफळापूरकर हिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या मेहंदीचे फोटो तसेच व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत ते दोघे लग्न करणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे त्यांचे चाहते देखील उत्सुक आहेत. दरम्यान, शाल्व-श्रेयाने त्यांच्या मेहंदी सोहळ्यासाठी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करून ट्युनिंग केल्याचं पाहायला मिळतंय. या फोटोंमध्ये शाल्व-श्रेयाची जोडी खूपच सुंदर दिसते आहे.
शाल्व किंजवडेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, तो सध्या झी मराठीवरील 'शिवा' मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळतोय. तर शाल्व किंजवडेकरची होणारी पत्नी श्रेया डफळापूरकर ही एक स्टायलिस्ट असून कॉस्टच्यूम डिझायनर आहे. अनेक सेलिब्रिटींसाठी तिने डिझायनर म्हणून काम केलं आहे.