'थोडं तुझं आणि थोडं माझं' फेम अभिनेत्याची लगीनघाई, थाटात पार पडला साखरपुडा; फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 10:49 IST2025-04-23T10:47:15+5:302025-04-23T10:49:54+5:30

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याची लगीनघाई, साखरपुड्याचे फोटो आले समोर

marathi television actor thoda tujh ani thoda majh fame rugved phadke engagement ceremony photo viral on social media | 'थोडं तुझं आणि थोडं माझं' फेम अभिनेत्याची लगीनघाई, थाटात पार पडला साखरपुडा; फोटो व्हायरल

'थोडं तुझं आणि थोडं माझं' फेम अभिनेत्याची लगीनघाई, थाटात पार पडला साखरपुडा; फोटो व्हायरल

Rugved Phadke Engagement Ceremony: सध्या मराठी कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. एकामागोमाग बरेच सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत. तर काहींनी २०२५ वर्षाच्या सुरुवातीला आपल्या प्रेमाची कबुली देत त्यांचं नातं कन्फर्म केलं. आता आणखी एका टीव्ही अभिनेत्याच्या घरी लगीनघाई सुरु असल्याचं आहे. हा अभिनेता ऋग्वेद फडके आहे.  त्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. 

स्टार प्रवाहवरील 'थोडं तुझं आणि थोडं माझं' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे ऋग्वेद फडके. या मालिकेत त्याने विनोद नावाचं पात्र साकारलं आहे. वेगवेगळ्या मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ऋग्वेद फडकेचा साखरपुडा पार पडला आहे. त्यानंतर आता लवकरच अभिनेता विवाहबंधनात अडकणार आहे. 'नवरी मिळे हिटलरला फेम' अभिनेत्री वल्लरी विराजने सोशल मीडयावर या कपलच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. 

दरम्यान, अभिनेता ऋग्वेद फडकेच्या होणाऱ्या पत्नीचं नाव विभा पवार असं आहे. गेल्या काही वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते. ऋग्वेदच्या साखरपुड्याला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी मंडळींना हजेली लावली होती. 

वर्कफ्रंट

ऋग्वेद फडकेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याने 'अबोल प्रितीची अजब कहाणी', 'लोकमान्य' यांसारख्या मालिकांमध्ये देखील तो झळकला आहे. याशिवाय रंगभूमीवरही त्याचा दांडगा वावर आहे. 

Web Title: marathi television actor thoda tujh ani thoda majh fame rugved phadke engagement ceremony photo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.