'आई कुठे...' फेम कौमुदी वलोकरची लगीनघाई, मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 17:04 IST2024-12-24T17:03:17+5:302024-12-24T17:04:53+5:30

अलिकडेच मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार लग्नबंधनात अडकले.

marathi television actress aai kuthe kay karte fame kaumudi walokar mehendi ceremony photos viral on social media | 'आई कुठे...' फेम कौमुदी वलोकरची लगीनघाई, मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर 

'आई कुठे...' फेम कौमुदी वलोकरची लगीनघाई, मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर 

Kaumodi Walokar: अलिकडेच मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार लग्नबंधनात अडकले. अभिनेत्री रेश्मा शिंदेसह निखिल राजेशिर्के, शाल्व किंजवडेकर तसेच किरण गायकवाड या कलाकारांनी लग्नगाठ बांधून आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली. आता यामध्ये आणखी एका नावाची भर पडणार आहे. लवकर मराठी मराठी मालिकाविश्वातील ही लोकप्रिय लग्नबंधननात अडकणार आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून कौमुदी वलोकर (Kaumodi Walokar) आहे. सध्या कौमुदीच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. दरम्यान, नुकतेच सोशल मीडियावर कौमुदीच्या मेंहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.


'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे कौमुदी वलोकर प्रसिद्धीझोतात आली. लवकरच ती लग्न करणार आहे. अगदी गेल्या महिन्यातच कौमुदीचं केळवण पार पडलं. त्यात आता अभिनेत्रीने तिच्या मित्रमंडळींसोबत ब्राईड टू बी पार्टी साजरी केली होती. अशातच इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून अभिनेत्रीने तिच्या मेहंदी सोहळ्याचे काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. आता कौमुदी येत्या काही दिवसात बोहल्यावर चढणार आहे. कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश चौकसे असं आहे. 

 

'आई कुठे काय करते' ही मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी त्यातील कलाकार प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. दरम्यान, 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीचा मुलगा म्हणजेच यशची भूमिका अभिनेता यश देशमुखने साकारली होती. मालिकेत यशची बायको म्हणजेच आरोहीची भूमिका अभिनेत्री कौमुदी वलोकरने साकारली होती. तिच्या या भूमिकेचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं.

कौमुदी वलोकरने 'आई कुठे काय करते' मालिकेत काम करून छोटा पडदा गाजवला. त्याआधी अभिनेत्रीन 'शाळा' चित्रपटात झळकली होती. परंतु तिला या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. 

Web Title: marathi television actress aai kuthe kay karte fame kaumudi walokar mehendi ceremony photos viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.