अभिनेत्री रुपाली भोसलेचं स्वप्न साकार! खरेदी केली नवीकोरी मर्सिडीज बेंझ, किंमत ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 14:18 IST2025-01-05T14:14:32+5:302025-01-05T14:18:08+5:30

मराठीसह हिंदी मालिकाविश्वामध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.

marathi television actress aai kuthe kay karte fame rupali bhosale buy new mercedes benz shared video on social media | अभिनेत्री रुपाली भोसलेचं स्वप्न साकार! खरेदी केली नवीकोरी मर्सिडीज बेंझ, किंमत ऐकून थक्क व्हाल

अभिनेत्री रुपाली भोसलेचं स्वप्न साकार! खरेदी केली नवीकोरी मर्सिडीज बेंझ, किंमत ऐकून थक्क व्हाल

Rupali Bhosle Buy New Car: मराठीसह हिंदी मालिकाविश्वामध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले (Rupali Bhosle). रुपालीने तिच्या करिअरमध्ये अनेक मालिकांमध्ये काम केलं, पण 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने तिला लोकप्रियता मिळाली. दरम्यान, 'आई कुठे काय करते' या मालिकेत तिने साकारलेलं संजना नावाचं पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. 'आई कुठे...' मालिकेने प्रेक्षकांच्या निरोप घेतला असला तरी त्यातील कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामधीलच एक नाव म्हणजे रुपाली भोसले. नुकताच अभिनेत्री रुपाली भोसलेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


दरम्यान, रुपाली भोसलेने नव्या वर्षाची सुरुवात दमदार पद्धतीने केली आहे. आपलं स्वप्न साकार करत अभिनेत्रीने नवीकोरी मर्सिडीज बेंझ ही गाडी खरेदी केल्याची पाहायला मिळत आहे.  या गाडीचे बाजारमुल्य लाखोंच्या घरात आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर रुपालीने नवी गाडी खरेदी केल्याचा व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर नवी गाडी खरेदी केल्याचा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "हे सर्व तेव्हा सुरु झालं जेव्हा एक दिवस गाडी खरेदी घेण्याचा विचार माझ्या मनात आला, आज ते स्वप्न सत्यात उतरलं. फक्त जगण्यासाठी स्वप्न पाहू नका तर स्वप्नांसाठी जगा. "

पुढे रुपालीने म्हटलंय, "तुमच्या स्वप्नांवर प्रेम करा, अडचणींवर मात करा. मग कितीही मोठ्या संकटांचा सामना करावा लागला तरी चालेल. त्यामुळे कधीही हार मानू नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय जमत नाही याकडे पाहण्यापेक्षा आपण काय करू शकतो त्यावर काम करा. वेलकम बेबी & ग्लो टुगेदर ग्रो टुगेदर..." अशा आशयाची पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

Web Title: marathi television actress aai kuthe kay karte fame rupali bhosale buy new mercedes benz shared video on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.