"माणूस आपल्यात नसूनही...", वडिलांच्या आठवणीत अश्विनी महांगडे झाली भावुक; शेअर केली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 15:01 IST2025-03-01T14:56:32+5:302025-03-01T15:01:53+5:30
अश्विनी महांगडे वडिलांच्या आठवणीत भावुक; म्हणाली....

"माणूस आपल्यात नसूनही...", वडिलांच्या आठवणीत अश्विनी महांगडे झाली भावुक; शेअर केली पोस्ट
Ashwini Mahangade: अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade)या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज तसंच 'आई कुठे काय करते' या (Aai Kuthe Kay Karte) मालिकांमुळे ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. आई कुठे काय करते मालिकेमुळे तिचा वेगळाच चाहतावर्ग निर्माण झाला आहे. अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. परंतु सोशल मीडियाद्वारे अभिनेत्री तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकतीच सोशल मीडियावर अश्विनीने तिच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलेलं कॅप्शन पाहून नेटकरी सुद्धा भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय.
अश्विनी महांगडे अभिनयासह राजकीय क्षेत्रातही तितकीच सक्रिय आहे. विविध सामाजिक संस्थांसाठी ती काम करते. अशातच अभिनेत्रीने तिच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त डोळे पाणावणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, "वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा नाना…, माणूस आपल्यात नसूनही असण्याचा भास होत राहणं हेच प्रेम असावं बहुतेक...",असं तिने या पोस्टमध्ये लिहिलंय.
अश्विनी महांगडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. याशिवाय तिने बॉईज, टपाल, महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात काम केले आहे.