'लक्ष्मी निवास' फेम दिव्या पुगावकरची लगीनघाई; पार पडला मेहंदी सोहळा, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 15:13 IST2025-02-13T15:11:47+5:302025-02-13T15:13:32+5:30

सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

marathi television actress divya pugaonkar mehendi ceremony photos viral on social media | 'लक्ष्मी निवास' फेम दिव्या पुगावकरची लगीनघाई; पार पडला मेहंदी सोहळा, फोटो आले समोर

'लक्ष्मी निवास' फेम दिव्या पुगावकरची लगीनघाई; पार पडला मेहंदी सोहळा, फोटो आले समोर

Divya Pugaonkar: सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत बरेच मराठी कलाकार लग्नबंधनात अडकले. सोनाली-अभिषेक, निखिल राजेशिर्के, रेश्मा शिंदे तसेच शिवानी-अंबर या कलाकारांच्या पाठोपाठ आता आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर आहे. अभिनेत्री दिव्या पुगावकर येत्या काही दिवसात लग्नबंधनात अडकणार आहे. दरम्यान, आता दिव्याच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. अलिकडेच ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील कलाकारांनी दिव्याच्या केळवणाचं आयोजन केलं होतं. केळवण झाल्यानंतर आता अभिनेत्रीचा मेहंदी सोहळा पार पडला आहे. याचा खास व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

दिव्या पुगावकर लवकरच तिचा प्रियकर अक्षय घरतसोबत लग्नगाठ बांधणार आहे. नुकताच अभिनेत्रीचा मेहंदी सोहळा पार पडला. याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन तिने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. "Its Started..." असं कॅप्शन देत दिव्याने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून शेअर केल्याचा पाहायला मिळतोय. त्यामुळे आता दिव्या पुगावकर कधी लग्नबंधनात अडकणार याची चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, दिव्या पुगावकर ही बऱ्याच कालावधीपासून अक्षय घरतसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. अक्षय घरत हा फिटनेस मॉडेल असून न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्याची ओळख आहे. अक्षय आणि दिव्या बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आता दोघंही आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहेत. दोघांच्याही घरी आता लगीनघाई सुरू झाली आहे. पण, दिव्यानं लग्नाची तारीख अद्याप चाहत्यांसोबत शेअर केलेली नाही.  

Web Title: marathi television actress divya pugaonkar mehendi ceremony photos viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.