ज्ञानदा रामतीर्थकरच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला ८ वर्ष पूर्ण; पोस्ट शेअर करत म्हणते- "तुमचं इतकं प्रेम..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:42 IST2025-01-08T12:38:32+5:302025-01-08T12:42:24+5:30
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर. नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

ज्ञानदा रामतीर्थकरच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला ८ वर्ष पूर्ण; पोस्ट शेअर करत म्हणते- "तुमचं इतकं प्रेम..."
Dnyanada Ramtirthkar: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar) घराघरात पोहोचली. वेगवेगळ्या मराठी मालिका, वेबसीरिजमध्ये काम करून ज्ञानदाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या अभिनेत्री 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत तिने साकारलेलं काव्या मोहिते पाटील नावाचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हजरजबाबी, खोडकर आणि प्रेमळ असणारी काव्या सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, आज ज्ञानदाच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
ज्ञानदा रामतीर्थकरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवासावर भाष्य केलं आहे. दरम्यान, इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, "प्रिय सगळेच, आज ८ वर्ष झाली..! माझ्या आणि कॅमेराच्या भेटीला. माझ्या आणि रसिक प्रेक्षकांच्या भेटीला, तुमच्या माझ्यावरच्या प्रेमाला. मी पुणे सोडून मुंबईत आले. थोडक्यात काय..! आज माझ्या करिअरला ८ वर्ष पूर्ण झाली. कसे गेले हे दिवस कधी गेले कळलेच नाहीत. आज तुमचं इतकं प्रेम मिळतं हे बघून खूप आनंद होतो, भरून येतं. असेच प्रेम करत रहा, आशीर्वाद देत रहा. तुमची लाडकी, ज्ञानदा!"
सोशल मीडियावर ज्ञानदाने शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह मराठी कलाकार मंडळीही व्यक्त होताना दिसत आहेत. अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी यांनी "नेहमीच प्रेम आणि सपोर्ट..." अशी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. तर ज्ञानदाच्या चाहत्यांनी देखील तिचं कौतुक करत पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.