VIDEO: लव्हयापा हो गया! ट्रेंडिंग गाण्यावर ज्ञानदा अन् विवेकचा जबरदस्त डान्स, एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 17:50 IST2025-01-16T17:46:45+5:302025-01-16T17:50:55+5:30
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

VIDEO: लव्हयापा हो गया! ट्रेंडिंग गाण्यावर ज्ञानदा अन् विवेकचा जबरदस्त डान्स, एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष
Dnyanada Ramtirthkar And Vivek Sangle Dance: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अभिनेत्री मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विजय आंदळकर आणि विवेक सांगळे अशी तगडी स्टारकास्ट मालिकेत पाहायला मिळतेय. १६ डिसेंबर २०२४ पासून ही मालिका प्रसारित करण्यात आली. दरम्यान, अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर मालिकेत मृणालच्या बहिणीची म्हणजेच काव्या मोहिते पाटील नावाच्या भूमिकेत दिसतेय तर विवेक सांगळेने जन्नजेय हे पात्र साकारलं आहे. 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील विवेक आणि ज्ञानदाची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते आहे. या जोडीला प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत. दरम्यान, नुकताच ज्ञानदा रामतीर्थकरने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
ज्ञानदाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर खास व्हिडीओ शेअर केल्याचा पाहायला मिळतोय. या व्हिडीओमध्ये जुनैद खानच्या बहुचर्चित 'लव्हयापा' सिनेमातील 'लव्हयापा हो गया' या ट्रेंडिंग गाण्यावर विवेक सांगळे आणि ज्ञानदा डान्स करताना दिसत आहेत. 'लव्हयापा' मधील गाण्यातील सिग्नेचर स्टेप्स करुन या दोघांनी सुंदररित्या डान्स केलाय. व्हिडीओमध्ये ज्ञानदा-विवेकचा मजेशीर अंदाज पाहायला मिळतोय. "ऑन पब्लिक डिमांड... काव्या आणि जीवाचा लव्हयापा!" असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलं आहे. त्यांच्या या व्हिडीओवर मराठी कलाकरांसह चाहत्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
वर्कफ्रंट
स्टार प्रवाह'च्या 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून ज्ञानदा घराघरात पोहोचली. त्यानंतर अभिनेत्री आता 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत पाहायला मिळतेय. तर जवळपास ८ वर्षांनंतर विवेक सांगळे स्टार प्रवाहवरील मालिकेत दिसतोय. 'आई माझी काळूबाई', 'लव्ह लग्न लोचा' या मालिकांमधून विवेक घराघरात पोहोचला. शिवाय विवेक अलिकडेच भाग्य दिले तू मला मालिकेत दिसला.