'मुरांबा' फेम शिवानी मुंढेकरच्या वडिलांना पाहिलंत का? वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने लिहिली सुंदर पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 12:00 IST2025-03-06T11:54:30+5:302025-03-06T12:00:17+5:30
वडिलांच्या वाढदिवसानिमित्त शिवानी मुंढेकरची खास पोस्ट, म्हणाली...

'मुरांबा' फेम शिवानी मुंढेकरच्या वडिलांना पाहिलंत का? वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने लिहिली सुंदर पोस्ट
Shivani Mundhekar: 'मुरांबा' ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असणारी मालिका आहे. या मालिकेचं कथानक तसंच कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींमुळे दिवसेंदिवस मालिकेचा प्रेक्षकवर्ग वाढत आहे. रमा आणि अक्षय ही मालिकेतील दोन मुख्य पात्र आहेत. यामध्ये अभिनेता शशांक केतकर हा अक्षय मुकादमचं पात्र साकारतो आहे. तर शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) रमाच्या भूमिकेत पाहायला मिळतेय. अलिकडेच रमाचा अपघात झाला असून मॉडर्न लूकमध्ये माही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर शिवानी खूप सक्रिय असते. अनेकदा तिचे फोटो, मजेशीर व्हिडीओ, डान्स व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त ही खास पोस्ट शेअर केली आहे.
शिवानी मुंढेकरचे वडील रविंद्र मुंढेकर यांचा काल वाढदिवस होता. यानिमित्ताने अभिनेत्रीने खास सेलिब्रेशन करत वडिलांचा वाढदिवस साजरा केला. व्हिडीओद्वारे शिवानीने वडिलांसोबत घालवलेले काही सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा..., आय लव्ह यू...!" असं कॅप्शन देत अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. . यात शिवानी आणि तिच्या वडिलांचं सुंदर असं बॉण्डिंग पाहायला मिळत आहे. शिवानी मुंढेकरने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहे.
दरम्यान, शिवानी मुंढेकरची 'मुरांबा' ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेच्या माध्यमातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं आहे. या मालिकेत शिवानीने साकारलेल्या 'रमा' या पात्राला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे.