"त्यांनी मला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, पण...", 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 12:08 IST2025-04-07T12:01:19+5:302025-04-07T12:08:56+5:30
शीतल क्षीरसागर (Shitaal Kshirsaagar) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

"त्यांनी मला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, पण...", 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Shitaal Kshirsaagar: शीतल क्षीरसागर (Shitaal Kshirsaagar) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. माझी तुझी रेशीमगाठ ‘का रे दुरावा’, ‘रमा राघव’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या शीतल क्षीरसागरने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. छोट्या पडद्यावर तिने आपले नकारात्मक भूमिका उत्तमरित्या साकारल्या. सध्या अभिनेत्री 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत पाहयला मिळतेय. दरम्यान, शीतल क्षीरसागरने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या करिअरमधील काही कटू अनुभवांवर भाष्य केलं आहे.
नुकतीच अभिनेत्री शीतल क्षीरसागरने इट्स मज्जा ला मुलाखत दिली. त्यामध्ये अभिनेत्रीने अनेक धक्कादायक खुलासे केले. "माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काही अनुभवांमुळे मी स्वत: ला प्रॉमिस केलं होतं. असं की काही अनुभवी कलाकार माझ्याशी ज्या पद्धतीने कळत-नकळतपणे वागत होते. ज्याने मला त्रास होत होता किंवा माझ्या भूमिका सापडण्याच्या मार्गात तसेच परफॉर्म करण्याच्या मार्गात ते अडथळे बनून उभे राहत होते. जेव्हा त्यांनी मला खाली खेचण्याचा प्रयत्न केला तर त्या प्रत्येक वेळी स्वत: ला हे प्रॉमिस केलं होतं की, काही वर्षानंतर आपण एक अनुभवी कलाकार असणार आहोत. तेव्हा तू काम करत असशील किंवा नसशील त्यावेळी आपण असं काही करायचं नाही. जर तुला कोणाला सपोर्ट करता येत नसेल तर मी गप्प राहणं पसंत करेन. पण, आपण कोणाचा पाय खेचायचा नाही किंवा कोणाचं मन दुखवेल असं बोलायचं नाही. हा मी जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे."
पुढे अभिनेत्री म्हणाली, "त्यामुळे जेव्हा मला माझ्यापासून वयाने कमी असणाऱ्या सहकलाकारांकडे बघून त्यांचं कौतुक वाटतं. त्यामुळे मीजर त्यांना काही सांगितलं तर ते नक्की ऐकतात. तसंच त्यांनी जर नाहीच ऐकलं तर मला त्याचं काही वाईट वाटत नाही." असा खुलासा अभिनेत्रीने केला.