'आई कुठे...' फेम रुपाली भोसले अन् शिल्पा शिरोडकरची ग्रेट भेट! अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:29 IST2025-02-25T12:25:15+5:302025-02-25T12:29:01+5:30
रुपाली भोसलेने सोशल मीडियावर एका शेअर केलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

'आई कुठे...' फेम रुपाली भोसले अन् शिल्पा शिरोडकरची ग्रेट भेट! अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली...
Rupali Bhosle: अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle)हे नाव मराठी मालिका विश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत अभिनेत्री संजना नावाच्या खलनायिकेचं पात्र साकारत होती. तिने साकारलेलं हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. दरम्यान, रुपाली भोसले कायमच चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकतीच रुपाली भोसलेने सोशल मीडियावर एका शेअर केलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
रुपाली भोसलने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघींच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसतो आहे. याशिवाय दोघीही खळखळून हसत आहेत. दरम्यान, शिल्पा शिरोडकरसोबतचे हे खास फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिलंय, "काल या सुंदर अभिनेत्रीला एनडीटीव्ही मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात भेटले, तितकीच ती मनानेही सुंदर आहे. पहिल्यांदा ही माझ्यासाठी फॅन मोमेंट होती आणि त्यापेक्षा खूप दिवसांनी मी माझ्या एका मैत्रीणीशी बोलत आहे, असं मला वाटत होतं."
पुढे अभिनेत्रीने लिहिलंय, "तू खरोखरच एक प्रेमळ काळजी घेणारी व्यक्ती आहेस. जसं तुला आम्ही बिग बॉसमध्ये १०५ दिवस पाहिलं, प्रत्यक्षात देखील तू तशीच आहेस. आमच्यासारखे अनेक चाहते तुला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्याची वाट पाहत आहेत. शिल्पा ताई अशीच कायम हसत राहा आणि लोकांना प्रेम देत राहा. तुझ्या आगामी सर्व प्रोजेक्ट्ससाठी मी तुला शुभेच्छा देते. गणपती बाप्पा मोरया...! मला आशा आहे की लवकरच आपली पुन्हा भेट होईल..., आय लव्ह यू...!" अशा आशयाची पोस्ट अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केल्याची पाहायला मिळतेय.
दरम्यान, रुपाली भोसलेने शेअर केलेल्या पोस्टवर मराठी कलाकारांसह तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.