"समृद्धी घर रिकामं होतंय", रुपाली भोसलेने शेअर केला 'आई कुठे...' च्या सेटवरील व्हिडीओ; अभिनेत्री झाली भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 18:07 IST2024-11-18T18:04:41+5:302024-11-18T18:07:14+5:30
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe kay karte) या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.

"समृद्धी घर रिकामं होतंय", रुपाली भोसलेने शेअर केला 'आई कुठे...' च्या सेटवरील व्हिडीओ; अभिनेत्री झाली भावुक
Rupali Bhosle: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe kay karte) या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. सध्या ही मालिका शेवटच्या टप्प्यावर आहे. गेल्या पाच वर्षांपासून 'आई कुठे काय करते' मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आता मालिकेचे निरोपाचे भागही समोर येत आहेत. दरम्यान, ही मालिका आणि त्यातील पात्रे कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहतील.अशातच मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेने (Rupali bhosle) सेटवरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रुपाली भोसलेने 'आई कुठे काय करते' मालिकेत खलनायिकेचं पात्र उत्तमरित्या साकारलं. संजना म्हणून ती चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाली. या मालिकेमुळे अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. नुकताच इन्स्टाग्रामवर रुपालीने या मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ पोस्ट केलाय.
लवकरच ही मालिका लवकरच बंद होणार असल्यामुळे तेथील अतिरिक्त वस्तू दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केल्या जात आहेत.त्यादरम्यानचे क्षण कॅमेऱ्याच कैद करत तिने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओला तिने "समृद्धी घर खाली होतंय..." असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्री रुपाली भोसले देखील भावुक झाल्याचं पाहायला मिळतयं.
'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका लवकरच बंद होणार असल्याची माहिती कळताच प्रेक्षक देखील नाराज आहेत.