फोटोतील 'या' अभिनेत्रीला ओळखू शकता का? गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये करतीये काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 17:18 IST2023-08-28T17:17:47+5:302023-08-28T17:18:29+5:30
Marathi actress: या अभिनेत्रीने पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली.

फोटोतील 'या' अभिनेत्रीला ओळखू शकता का? गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये करतीये काम
आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा द्यायला प्रत्येकालाच आवडतं. त्यामुळे बऱ्याचदा सुट्टीच्या दिवशी किंवा घरात एखादा कार्यक्रम असला की जुने अल्बम चाळले जातात. सध्याचा काळ तर सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे अनेक कलाकार मंडळी त्यांच्या बालपणीचे फोटो चाहत्यांसोबतही शेअर करतात. अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही अभिनेत्री आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एक चिमुकली मुलगी तिच्या आईच्या कडेवर बसली आहे. ती लहानगी तिच्या आईसोबत एखाद्या पर्यटन ठिकाणी गेल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे फोटोत हसणारी ही गोड चिमुकली आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
फोटोत दिसणारी ही चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून लवंगी मिरची अर्थात अभिनेत्री शिवानी बावकर आहे. मदर्स डे निमित्त शिवानीने तिच्या आईसोबतचा हा फोटो शेअर केला होता. शिवानी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून झी मराठीवरच्या 'लागीरं झालं जी' या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.
दरम्यान, २०१७ मध्ये सुरु झालेली ‘लागिर झालं जी’मालिका जवळपास २ वर्ष सुरु होती. या मालिकेनंतर शिवानीने ‘अल्टी पल्टी सुमडीत कल्टी’, ‘कुसुम’, ‘लवंगी मिरची’ या मालिकांमध्ये झळकली.