"अभिनय क्षेत्रात येताना नातेवाईक म्हणायचे...", अभिनेत्री गिरीजा प्रभूने सांगितला 'तो' संघर्ष काळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 15:15 IST2025-02-08T15:13:19+5:302025-02-08T15:15:41+5:30
अभिनेत्री गिरीजा प्रभूने संघर्ष काळातील आठवणींना उजाळा दिला आहे.

"अभिनय क्षेत्रात येताना नातेवाईक म्हणायचे...", अभिनेत्री गिरीजा प्रभूने सांगितला 'तो' संघर्ष काळ
Girija Prabhu: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिकेच्या छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत अभिनेता मंदार जाधव आणि गिरीजा प्रभू (Girija Prabhu) यांची मुख्य भूमिका होती. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री गिरिजा प्रभू हे नाव घराघरात पोहोचलं. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मध्ये तिने साकारलेलं गौरी नावाच्या प्रेक्षकांना भरभरुन प्रेम दिलं. करिअरमधील पहिल्याच मालिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या संघर्ष काळावर भाष्य केलं आहे.
नुकताच अभिनेत्रीने 'लोकमत फिल्मी'सोबत संवाद साधला. त्यादरम्यान अभिनेत्रीने तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल सांगितलं. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली, "मी आता जी आहे ती माझ्या आई-वडिलांमुळे आहे. कारण लहान असताना सुरुवात केली त्यामुळे तेव्हा कळत नव्हतं की काय करायचं? कुठे जायचं? आपल्याला काय आवडतं? त्यामुळे असंच गॅदरिंगमध्ये भाग घेतला तेव्हा मी ते चांगलं करत होते. त्यामुळे माझ्या आई-वडिलांना सांगितलं की हिला प्रोफेशनली शिकू द्या. तर ते होते ज्यांनी मला सपोर्ट केला. अर्थात या क्षेत्रातलं माझ्या फॅमिलीमधील कोणीच नाही. त्यामुळे त्यांनाही कल्पना नव्हती की पुढे कसं जायचं? तर आम्ही ती वाट शोधत शोधत एक एक पाऊल टाकत इथपर्यंत आलोय. त्यांच्या सपोर्टमुळेच मी आज जी आहे ती आहे."
पुढे गिरीजाने सांगितलं, "माझ्या या प्रवासात आईचा मोठा हातभार आहे. अर्थात बाबांचाही आहे. मी पिंपरी चिंचवडला राहायचे तर तेव्हा तिथे एवढ्या अॅक्टिव्हिटीज चालायच्या नाहीत. डान्स क्लास असेल किंवा अॅक्टिंग क्लास असो. जे काही आहे ते पुण्यात व्हायचं. तर शाळा संपल्यानंतर मला तिकडे घेऊन जाणं. तिथे माझा क्लास संपेपर्यंत बसणं या सगळ्या गोष्टी किंवा कुठलं ऑडिशन असेल, कुठला इव्हेंट असेल तर माझ्याबरोबर येणं. इतर गोष्टींसाठी पैसे नाही खर्च करणार, हॉटेलमध्ये जाणं, फिल्म बघायला जाणं. इथे पैसे नाही खर्च नाही करणार कारण तेवढं शक्य नव्हतं. पण, माझ्या कॉस्च्यूमसाठी असेल मेकअपसाठी असेल, ज्वेलरीसाठी असेल त्या गोष्टींसाठी आई-बाबा नक्की खर्च करायचे. माझ्या फिल्डला जे गरजेचं आहे त्या गोष्टींसाठी खर्च करताना ते कधीच नाही म्हणाले नाही. त्यामुळे मला असं वाटतं ती एक सवय मला लागली. कारण जिथे गरजेचं आहे तिथेच खर्च केला पाहिजे."
नातेवाईकांचं म्हणणं होतं की...
"आई-बाबांच्या सपोर्टमुळे हे सगळं शक्य झालं आहे. कारण 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका करताना मी फर्स्ट इयरला होते. जेव्हा असं ठरलं की तू ही भूमिका करतेस आणि हे फायनल झालंय. तेव्हा मला प्रश्न पडला की मग आता कॉलेजचं कसं होणार. तर आई-बाबाच होते जे मला म्हणाले आम्ही आहोत तू कर बाकीच्यांचा विचार करू नकोस. आणखी एक महत्वाचं म्हणजे या फिल्डमधलं कोण नसल्यामुळे माझे जे नातेवाईक आहेत. ते असं म्हणणं होतं की, या क्षेत्रात तू जाणार मुलगी आहेस कसं होणार. पण, तेव्हा सुद्धा माझ्या आई-बाबाच होते, जे माझ्या पाठीशी उभे होते." असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.