'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 13:58 IST2025-01-01T13:55:29+5:302025-01-01T13:58:59+5:30
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, फोटो आले समोर.

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर
Tejaswini Sunil : मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार यंदा लग्नबंधनात अडकले. आपल्या जोडीदारासोबत लग्नगाठ बांधून त्यांनी नव्या प्रवासाला सुरूवात केली. मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्री रेश्मा शिंदे, निखिल राजेशिर्के तसेच शाल्व किंजवडेकर या कलाकारांनी २०२४ मध्ये लग्न केलं. त्यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. लोकप्रिय 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतील अभिनेत्री तेजस्विनी सुनील (Tejaswini Sunil) देखील ३१ डिसेंबरच्या दिवशी विवाहबंधनात अडकली. या अभिनेत्रीच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.
तेजस्विनीने श्रीराम निजामपूरकरसोबत लग्न करून नव्या इनिंगला सुरूवात केली आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. अभिनेत्री तेजस्विनीने तिच्या लग्नासाठी खास लूक केला होता. हिरव्या रंगाची साडी त्यावर मराठमोळा साज केल्याचा पाहायला मिळतोय. तर तिचा नवरा श्रीरामने पेशवाई पोशाख परिधान केलाय. २०२४ मध्ये लग्नबंधनात अडकल्याने अभिनेत्रीने या पोस्टला खास कॅप्शनदेखील दिल्याचं पाहायला मिळतंय.
दरम्यान, तेजस्विनी सुनीलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिने झी मराठीवरील गाजलेल्या 'स्वराज्यरक्षक संभाजी', 'गाथा नवनाथांची', 'बाळूमामाच्या नावनं चांगभलं' तर झी टीव्हीवरील 'काशीबाई बाजीराव बल्लाळ' या मालिकेमध्येही काम केलं आहे.