'पारू'च्या रिअल लाइफ नवऱ्याला पाहिलं का? गेल्या वर्षीच बांधली लग्नगाठ, सिनेइंडस्ट्रीतच करतो काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 13:26 IST2024-05-03T13:24:58+5:302024-05-03T13:26:50+5:30
सध्या अभिनेत्री शरयू सोनावणे एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

'पारू'च्या रिअल लाइफ नवऱ्याला पाहिलं का? गेल्या वर्षीच बांधली लग्नगाठ, सिनेइंडस्ट्रीतच करतो काम
Sharayu Sonawane Wedding Anniversary : सध्या अभिनेत्री शरयू सोनावणे एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिने काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
अभिनेत्री शरयू सोनावणे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलं आहे. स्टार प्रवाहवरील ''पिंकीचा विजय असो' या मालिकेमुळे ती प्रकाशझोतात आली. या मालिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. सध्या अभिनेत्री झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या 'पारू' या मालिकेत काम करताना दिसतेय. तिच्याबरोबर अभिनेता प्रसाद जवादे देखील मुख्य भूमिकेत आहे.
गतवर्षी शरयूने फिल्ममेकर जयंत लाडे याच्यासोबत लग्नगाठ बांधली. नुकतेच तिने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून नवऱ्याला शुभेच्छा देणारी खास पोस्ट शेअर केली आहे. ''३६५ दिवसांच्या अविस्मरणीय आठवणी, वचनबद्धता आणि अतूट प्रेम.या सुंदर प्रवासाला १ वर्ष पूर्ण झालं'' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
शरयूनं शेअर केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री तितिक्षा तावडेसह मुग्धा कर्णिक, सचिन देशपांडे या कलाकारांनी कमेंट्सच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.