'आमच्या ४ महिन्यांच्या चिमुकलीच्या डोळ्याला संसर्ग झाला अन्..'; लेकीच्या आजारपणाबाबत समीरची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 11:51 AM2022-07-11T11:51:31+5:302022-07-11T11:52:15+5:30

Sameer paranjpe: काही दिवसांपूर्वीच समीरच्या लेकीचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर करत एका तिला आलेल्या आजारपणामध्ये त्याची कशी अवस्था झालेली हे सांगितलं.

marathi tv actor sameer paranjpe share special post about his little princess | 'आमच्या ४ महिन्यांच्या चिमुकलीच्या डोळ्याला संसर्ग झाला अन्..'; लेकीच्या आजारपणाबाबत समीरची पोस्ट चर्चेत

'आमच्या ४ महिन्यांच्या चिमुकलीच्या डोळ्याला संसर्ग झाला अन्..'; लेकीच्या आजारपणाबाबत समीरची पोस्ट चर्चेत

googlenewsNext

'सुंदरा मनामध्ये भरली' ( sundara mannmadhe bharli) या मालिकेत सध्या अभी आणि लतिका यांच्या आयुष्यात धक्कादायक वळण आल्याचं पाहायला मिळत आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभीला म्हणजेच अभिनेता समीर परांजपे (sameer paranjpe ) याला विशेष लोकप्रियता मिळाली. उत्तम अभिनयशैली आणि हँडसम असल्यामुळे तरुणींमध्ये त्याची कमालीची क्रेझ आहे. समीर उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक गायकदेखील आहे. त्यामुळे वरचेवर तो त्याच्या गाण्याचे व्हिडीओ शूट करुन शेअर करत असतो. मात्र, यावेळी त्याने त्याच्या लेकीसोबतचा एक व्हिडीओ शेअर करत तिच्या आजारपणाविषयी भाष्य केलं आहे.

समीर सोशल मीडियावर सक्रीय असून प्रोफेशनल लाइफसोबतच तो त्याच्या पर्सनल आयुष्यातील गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वीच समीरच्या लेकीचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर करत एका तिला आलेल्या आजारपणामध्ये त्याची कशी अवस्था झालेली हे सांगितलं. एक पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती दिली.

काय म्हणाला समीर?

"समीर त्याच्या लेकीबाबत प्रचंड हळवा आहे आणि त्याच्या पोस्टमधून हे वारंवार दिसून येतं. विशेष म्हणजे लेकीवरचं हे प्रेम, काळजी त्याची या पोस्टमधूनही पाहायला मिळाली.  आमची चिमुकली ४ महिन्यांची असताना तिच्या उजव्या डोळ्याला संसर्ग झाला होता. ज्यामुळे ती प्रचंड चिडचिडी झाली होती. रात्रभर जागी राहिल्यामुळे वैतागलेली ही चिमुकली जणू आमच्या सहनशक्तीचा ठाव घेत होती. या दुखण्यावरुन तिचं लक्ष विचलित व्हावं यासाठी आम्ही ना-ना तर्हेच्या युक्त्या केल्या. वेगवेगळी गाणी म्हणून आम्ही तिला शांत करायचा प्रयत्न करत होतो", असं समीर म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "अखेर ए.आर. रहमान सरांची जादू झाली.  त्यांचं 'छोटीसी आशा' हे गाणं म्हटल्यावर ती शांत झाली आणि तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं. तिचं हे हास्य पाहून आम्ही सुखावलो. आता हे गाणं तिचं आवडतं झालं आहे आणि तिच्यामुळे माझंही."

दरम्यान,  समीरने आजवर अनेक नाटक, मालिका, एकांकिकांमध्ये काम केलं आहे. समीरने राकेश सारंग यांच्या ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर गोठ, गर्जा महाराष्ट्र आणि अग्निहोत्र २ या मालिकांमध्ये तो झळकला. तसंच भातुकली या चित्रपटातही त्याने काम केलं आहे.
 

Web Title: marathi tv actor sameer paranjpe share special post about his little princess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.