Video: रुपाली भोसलेने केलं गुपचूप लग्न? नवऱ्याच्या गळ्यात घातलं मंगळसूत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 01:14 PM2022-02-13T13:14:02+5:302022-02-13T13:14:42+5:30

Rupali bhosale: सध्या सोशल मीडियावर रुपालीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने चक्क लग्न केल्याचं दिसून येत आहे.

marathi tv actress rupali bhosale share her new video on instagram | Video: रुपाली भोसलेने केलं गुपचूप लग्न? नवऱ्याच्या गळ्यात घातलं मंगळसूत्र

Video: रुपाली भोसलेने केलं गुपचूप लग्न? नवऱ्याच्या गळ्यात घातलं मंगळसूत्र

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले (rupali bhosale). 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत सध्या रुपाली, संजना ही भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारुनही रुपालीने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच मोहिनी घातली. त्यामुळे रुपाली भोसले आज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर रुपालीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने चक्क लग्न केल्याचं दिसून येत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रुपालीने अलिकडेच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती नववधूच्या वेशात दिसत असून तिच्यासोबत नवरदेवाच्या रुपात आणखी एक मुलगा उभा असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे रुपालीने गुपचूप लग्न केलं की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

सध्या सोशल मीडियावर रुपालीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र, रुपालीने खरोखर लग्न केलं नसून तिच्या आगामी म्युझिक अल्बममधील एक प्रोमो असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रुपालीसोबत समीर सावे झळकला आहे. परंतु, या जोडीने खरोखर लग्न केलं नसून त्यांच्या आगामी म्युझिक अल्बमचा तो एक भाग आहे. रुपालीचं 'नाते नवेसे' हे नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सागरिका म्युझिक या युट्यूब चॅनेलवर हे गाणं प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या गाण्याचा एक भाग म्हणून तिने सेटवरील नववधूच्या वेशातील व्हिडीओ शेअर केला आहे.
 

Web Title: marathi tv actress rupali bhosale share her new video on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.