घटस्फोटानंतरही अनिरुद्धने गाजवला हक्क; अरुंधतीने थेट उत्तर देत केली बोलती बंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 20:46 IST2021-11-17T20:44:52+5:302021-11-17T20:46:35+5:30
Aai kuthe kay karte : सुरुवातीच्या काळात खचून गेलेली अरुंधती आता आत्मनिर्भर झाली असून ती स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ लागली आहे.

घटस्फोटानंतरही अनिरुद्धने गाजवला हक्क; अरुंधतीने थेट उत्तर देत केली बोलती बंद!
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते. एक मध्यमवर्गीय गृहिणीच्या भोवती फिरणाऱ्या या मालिकेत आतापर्यंत अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळालं. घर, कुटुंब, संसार या चौकटीमध्ये अडकलेल्या अरुंधतीची अनिरुद्धने अर्ध्यावर वाट सोडली. परंतु, सुरुवातीच्या काळात खचून गेलेली अरुंधती आता आत्मनिर्भर झाली असून ती स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ लागली आहे. अनिरुद्धपासून विभक्त झाल्यानंतर अरुंधती स्वावलंबी झाली आहे. मात्र, तरीदेखील अनिरुद्ध तिच्यावर पुर्वीसारखाच हक्क गाजवायचा प्रयत्न करतो.
स्टार प्रवाहने या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अनिरुद्ध, अरुंधतीला तिच्या गाण्याच्या ऑफरविषयी विचारतांना दिसतो. इतकंच नाही तर निर्णय घेतल्यावर सांग असंही सांगतो. त्यावर तुम्हाला सांगायची गरज नाही असं अरुंधती थेट सांगते.
काही दिवसांपूर्वी आशुतोष केळकर याने अरुंधतीसमोर एका म्युझिक अल्बमचा प्रस्ताव ठेवला होता. त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये अरुंधतीने गाणं गावं अशी त्याची इच्छा होती. यावर विचार करुन कळवते असं अरुंधती सांगते. त्यानंतर अरुंधती आई-आप्पांशी बोलत असते. या तिघांचं बोलण सुरु असतानाच, तू आशुतोषच्या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहेस का?, काय निर्णय आहे तो कळव, असं अनिरुद्ध, अरुंधतीला सांगतो. त्यावर, 'मी जो निर्णय घेईन तो माझा असेल, तुम्हाला सांगायची किंवा कळवायची आता मला गरज वाटत नाही', असं अरुंधती थेट सांगते.
दरम्यान, अरुंधतीने थेट फटकारल्यामुळे अनिरुद्ध थोडासा खजील होतो. सोबतच आता अरुंधतीच्या आयुष्यात आपल्याला स्थान नाही याची त्याला जाणीव होते. आता अरुंधती आशुतोषची ऑफर स्वीकारते की नाकारते हे येत्या भागात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.