सुरु झाला अरुंधतीचा शैक्षणिक प्रवास; इशाच्या नाकावर टिच्चून घेतला कॉलेजमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:25 IST2022-06-16T16:24:43+5:302022-06-16T16:25:13+5:30
Aai kuthe kay karte : सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती इशाच्या कॉलेजमध्ये स्वत: साठी अॅडमिशन घ्यायला गेल्याचं पाहायला मिळत आहे.

सुरु झाला अरुंधतीचा शैक्षणिक प्रवास; इशाच्या नाकावर टिच्चून घेतला कॉलेजमध्ये प्रवेश
'आई कुठे काय करते' ( aai kuthe kay akrte) या मालिकेतील अरुंधतीचं दिवसेंदिवस नवं रुप प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. देशमुखांच्या कुटुंबात असताना सतत दुसऱ्यांचा विचार करणारी, भित्रट अरुंधती आता नव्याने प्रेक्षकांसमोर येत आहे. अनिरुद्धने घटस्फोट दिल्यानंतर अरुंधती केवळ तिच्या पायावर उभी राहिली नाही. तर, तिने तिची स्वप्न पूर्ण करायला घेतली आहेत. यात नुकतीच तिने इशाच्या मनाविरुद्ध कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती इशाच्या कॉलेजमध्ये स्वत: साठी अॅडमिशन घ्यायला गेल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच डिस्टन्स एज्युकेशन घेण्यापेक्षा फूल डे कॉलेजमध्ये उपस्थित राहून शिकायची इच्छाही तिने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे तिच्या या इच्छांना कॉलेजच्या प्रिन्सिपलने बळ दिलं आहे.
दरम्यान, अरुंधतीने कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यावी, शिकावं अशी इशाची अजिबात इच्छा नव्हती. या वयात आईने शिकणं योग्य नाही असं तिला वाटतं. मात्र, इशाच्या नाकावर टिच्चून अरुंधतीने तिचं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.