आई कुठे काय करते: मायलेकीची बिंधास्त जोडी; अनघा आणि तिच्या आईचा डान्स पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 01:30 PM2022-01-11T13:30:00+5:302022-01-11T13:30:00+5:30

Aai kuthe kay karte: अनघा आणि तिच्या ऑनस्क्रीन आईचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही मायलेकीची जोडी भन्नाट डान्स करताना दिसत आहे. 

marathi tv serial aai kuthe kay karte fame angha and her Reel life mother dance video viral | आई कुठे काय करते: मायलेकीची बिंधास्त जोडी; अनघा आणि तिच्या आईचा डान्स पाहिलात का?

आई कुठे काय करते: मायलेकीची बिंधास्त जोडी; अनघा आणि तिच्या आईचा डान्स पाहिलात का?

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (Aai kuthe kay karte). सध्या या मालिकेत देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. अभि आणि अनघा या दोघांचा नुकताच थाटामाटात लग्नसोहळा पार पडला आहे.  विशेष म्हणजे हा लग्नसोहळा विशेष गाजला. अगदी यात कलाकारांनी परिधान केलेल्या कपड्यांपासून ते त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या रिल्स वा व्हिडीओपर्यंत. प्रत्येक गोष्टीची तुफान चर्चा रंगली. या चर्चांमध्ये अनघा आणि तिच्या ऑनस्क्रीन आईचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही मायलेकीची जोडी भन्नाट डान्स करताना दिसत आहे. 

सध्या सोशल मीडियावर अनघा आणि आशा या दोघींचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या दोघींना विशाखानेही साथ दिली आहे.  या व्हिडीओमध्ये या तिघी जणी सजना या गाण्यावर डान्स करतांना दिसत आहेत.

दरम्यान, या तिघींच्या व्हिडीओला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. त्यातच अनघाने नऊवारी साडी नेसून हा डान्स केल्यामुळे तो प्रेक्षकांना भावत आहे. या मालिकेत अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे, विशाखाची भूमिका पूनम चांदोरकर साकारत आहे. तर, अनघाची आई आशा ही भूमिका शलाका पवार वठवत आहेत.
 

Web Title: marathi tv serial aai kuthe kay karte fame angha and her Reel life mother dance video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.