लाल रंगाच्या साडीतील अरुंधतीचं नवं फोटोशूट पाहिलं का? नेटकऱ्यांच्या खिळल्या मधुराणीवर नजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 19:50 IST2022-03-23T19:49:54+5:302022-03-23T19:50:28+5:30
Madhurani gokhale: या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत असून अनेक जण या फोटोवर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडत आहेत.

लाल रंगाच्या साडीतील अरुंधतीचं नवं फोटोशूट पाहिलं का? नेटकऱ्यांच्या खिळल्या मधुराणीवर नजरा
'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर. या मालिकेत तिने अरुंधती ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. या मालिकेमुळे मधुराणी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची कायम चर्चा रंगत असते. यावेळी तिच्या नव्या फोटोची चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेली मधुराणी अनेकदा तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यावेळीही तिने एक नवा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने लाल रंगाची साडी नेसली आहे. असून नेहमीप्रमाणे तिने स्मित हास्य करत नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा फोटो शेअर करत तिने त्याला साजेसं कॅप्शनही दिलं आहे.
दरम्यान, या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत असून अनेक जण या फोटोवर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडत आहेत. सध्या मधुराणी आई कुठे काय करते या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत यशस्वी घोडदौड करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच या मालिकेतून मधुराणीला विशेष लोकप्रियता मिळत आहे.