अरुंधतीला सपोर्ट करणाऱ्या आशुतोषने टेकले संजनापुढे हात; रुपालीच्या तालावर धरला ताल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 03:59 PM2022-08-14T15:59:02+5:302022-08-14T16:00:16+5:30

Aai kuthe kay karte: कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय असलेली संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले कायम इन्स्टाग्रावर विविध रिल्स शेअर करत असते.

marathi tv serial aai kuthe kay karte sanjana and co star dance video viral | अरुंधतीला सपोर्ट करणाऱ्या आशुतोषने टेकले संजनापुढे हात; रुपालीच्या तालावर धरला ताल

अरुंधतीला सपोर्ट करणाऱ्या आशुतोषने टेकले संजनापुढे हात; रुपालीच्या तालावर धरला ताल

googlenewsNext

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) ही मालिका लोकप्रियतेमध्ये आणि टीआरपीमध्ये प्रथम स्थानावर आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये तिची कायम चर्चा रंगत असते. या मालिकेच्या कथानकासह त्यातील कलाकारांनीही प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. यात निगेटिव्ह भूमिकेत असलेल्या संजनाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. नकारात्मक भूमिका असतानाही ती उत्तमरित्या सादर केल्यामुळे रुपालीची नेटकऱ्यांमध्ये कायमच चर्चा रंगत असते. सध्या सोशल मीडियावर रुपाली आणि देशमुख कुटुंबातील पुरुष मंडळींचा एक धमाकेदार डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय असलेली संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले कायम इन्स्टाग्रावर विविध रिल्स शेअर करत असते. कोणताही नवा ट्रेंड आला की ती तो फॉलो करते. यात नुकताच तिने एका ट्रेंडी गाण्यावर रिल्स केलं असून यावेळी तिने देशमुख बॉईज आणि आशुतोषला तिच्या तालावर नाचवलं आहे. विशेष म्हणजे या सगळ्या पुरुषांनीही तिची साथ दिली.

रुपालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत यश, आशुतोष केळकर, अविनाश देशमुख, नितीन यांनी ताल धरला आहे. त्यामुळे मालिकेत कायम या चौघांसोबत धुसफूस करुन वाद घालणाऱ्या संजनाने अखेर त्यांना तिच्या तालावर नाचवलंच असं एकंदरीत चित्र पाहायला मिळालं.  त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 

Web Title: marathi tv serial aai kuthe kay karte sanjana and co star dance video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.