Video: संजनाला झाली अटक?; अनिरुद्धनेही पत्नी म्हणून स्वीकारण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 12:59 PM2022-04-17T12:59:22+5:302022-04-17T13:01:52+5:30

Aai kuthe kay karte: अलिकडेच संजनाने संपूर्ण देशमुख कुटुंबाची प्रॉपर्टी स्वत:च्या नावे करुन घेतली. इतकंच नाही तर राहतं घरदेखील तिने तिच्या नावावर केलं.

marathi tv serial aai kuthe kay karte Sanjana will be arrested | Video: संजनाला झाली अटक?; अनिरुद्धनेही पत्नी म्हणून स्वीकारण्यास दिला नकार

Video: संजनाला झाली अटक?; अनिरुद्धनेही पत्नी म्हणून स्वीकारण्यास दिला नकार

googlenewsNext

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मालिकांपैकी एक आहे. उत्तम कथानक आणि त्याला साजेशा कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका तुफान लोकप्रिय झाली. त्यातच सध्या या मालिकेत अनेक रंगतदार वळणं येत असल्याचं पाहायला मिळत आहे. अरुंधतीचं यश डोळ्यात खुपू लागल्यामुळे संजना वारंवार तिच्या विरुद्ध षडयंत्र रचत आहे. मात्र, आता अरुंधतीविरोधात कारस्थान करणं संजनाला महागात पडलं आहे. 

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये संजनाला पोलिस अटक करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर संजना गयावया करुन घरातील प्रत्येकाकडे वाचवण्यासाठी विनवणी करते. मात्र,यावेळी कोणीही तिची साथ देत नाही. इतकंच नाही तर अनिरुद्ध सुद्धा तिचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास नकार देतो.

अलिकडेच संजनाने संपूर्ण देशमुख कुटुंबाची प्रॉपर्टी स्वत:च्या नावे करुन घेतली. इतकंच नाही तर राहतं घरदेखील तिने तिच्या नावावर केलं. त्यामुळे अनिरुद्धसह घरातील प्रत्येकालाच जबर धक्का बसला. विशेष म्हणजे संजनाने फ्रॉड करुन देशमुखांचं घर बळकावल्यामुळे अरुंधती तिच्या विरोधात तक्रार दाखल करते. त्यामुळे पोलिस संजनाला अटक करतात.

दरम्यान, पोलिसांनी अटक केल्यानंतर संजनाची सुटका होईल का? देशमुख कुटुंबीय पुन्हा तिचा सून म्हणून स्वीकार करतील का? या प्रश्नांची उत्तरं मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.
 

Web Title: marathi tv serial aai kuthe kay karte Sanjana will be arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.