Aai kuthe kay karte update: आशुतोष अन् अनिरुद्धमध्ये शाब्दिक वाद; देशमुख कुटुंबात घोंघावतंय नवं वादळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 16:00 IST2021-12-07T15:59:42+5:302021-12-07T16:00:29+5:30
Aai kuthe kay karte update: अरुंधतीच्या आयुष्यात तिच्या जुन्या मित्राची एन्ट्री झाली. तर, दुसरीकडे अभीचं लग्न ठरलंय त्यामुळे देशमुख कुटुंबात अनेक घडामोडी घडतांना दिसत आहेत.

Aai kuthe kay karte update: आशुतोष अन् अनिरुद्धमध्ये शाब्दिक वाद; देशमुख कुटुंबात घोंघावतंय नवं वादळ
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (Aai kuthe kay karte). गेल्या काही भागांमध्ये या मालिकेत अनेक बदल झाल्याचं दिसून आलं. अरुंधतीच्या आयुष्यात तिच्या जुन्या मित्राची एन्ट्री झाली. तर, दुसरीकडे अभीचं लग्न ठरलंय त्यामुळे देशमुख कुटुंबात अनेक घडामोडी घडतांना दिसत आहेत. मात्र, या सगळ्यामध्ये आशुतोषचं वारंवार घरी येणं अनिरुद्धला फारसं रुचत नसल्याचं दिसून येत आहे. यामध्येच अनिरुद्ध, आशुतोषसोबत शाब्दिक वाद घालतांना दिसणार आहे.
स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अनिरुद्ध उगाचच कारण नसतांना आशुतोषसोबत भांडण करतांना दिसत आहे. मात्र, आशुतोष शांतपणे या सगळ्यांची उत्तर देतो. आशुतोषचं असं कूल राहणं अनिरुद्धला आवडत नसून त्याचा राग वाढतांना दिसत आहे.
प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये आशुतोष देशमुखांच्या घरात का थांबला हे सांगतांना दिसत आहे. "मी स्कूटर देऊन बाहेरच्या बाहेरुनच जाणार होतो", असं आशुतोष सांगतो. त्यावर,"पण अरुंधतीने तुम्हाला थांबायचा आग्रह केला, बरोबर ना मिस्टर केळकर?", असा प्रतिप्रश्न अनिरुद्ध विचारतो. यावर, "नाही. घराबाहेर मुलं बॅटमिंटन खेळतांना दिसली. ते पाहून मी थांबलो", असं आशुतोष म्हणतो.
दरम्यान, "तुम्ही खूप छान खेळता..गेम", असं कुत्सिकपणे अनिरुद्ध म्हणतो. त्यावर आशुतोषही त्याच पद्धतीने अनिरुद्धला उत्तर देतो. या दोघांच्या एकंदरीत संवादावरुन आशुतोषचं वारंवार देशमुखांकडे येणं अनिरुद्धला पटत नसल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.