मोहित्यांच्या घरी गणेशोत्सवाची धामधूम; थाटात होणार गणरायाचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 02:00 PM2022-08-29T14:00:12+5:302022-08-29T14:00:36+5:30

Ganesh chaturthi: छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये विविध सणवार, उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे यावेळीही कलर्स मराठीवरील मालिकांमध्ये गणरायाचं आगमन होणार आहे.

marathi tv serial celebrate ganesh chaturthi | मोहित्यांच्या घरी गणेशोत्सवाची धामधूम; थाटात होणार गणरायाचं आगमन

मोहित्यांच्या घरी गणेशोत्सवाची धामधूम; थाटात होणार गणरायाचं आगमन

googlenewsNext

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे आनंदाचं, उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. सारे जण गणरायच्या आगमनासाठी सज्ज असून प्रत्येकाच्या घरी जोरदार तयारी सुरु झाली आहे. यामध्येच मराठी मालिकादेखील मागे नाहीत. मालिकांमध्येही गणरायाच्या आगमनाची जल्लोषात तयारी सुरु झाली आहे.

छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये विविध सणवार, उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे यावेळीही कलर्स मराठीवरील मालिकांमध्ये गणरायाचं आगमन होणार आहे. यात खासकरुन काही निवडक मालिकांमध्ये गणेशोत्सवाचा थाट पाहायला मिळणार आहे.

'भाग्य दिले तू मला', 'राजा रानीची गं जोडी', 'जीव माझा गुंतला', 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकांमध्ये विशेष भाग बघायला मिळणार आहे. तर, 'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमात सूरवीर गणरायासाठी सुरेल गाणी सादर करणार आहेत. 

'भाग्य दिले तू मला' मालिकेत रत्नमाला मोहितेंच्या घरी बाप्पाचे आगमन होणार आहे. रत्नमाला यांना बाप्पाचा संकेत मिळणार आहे कि, कावेरी राजसाठी योग्य आहे. कावेरी, राज आणि घरातील सगळे मिळून सजावटीची तयार करताना दिसणार आहेत. 'जीव माझा गुंतला' मालिकेत खानविलकरांच्या घरात गणरायाचे मोठ्या धुमधडाक्यात आगमन होणार आहे. सगळे मिळून बाप्पाची पूजा करणार आहेत, नैवेद्य दाखवला जाणार आहे. मल्हार - अंतरा मिळून आरती करणार आहेत. पण, याच दरम्यान मेघदेखील घरात येणार आहे. आता मेघच्या येण्याने कोणते संकट येईल ? हे कळेलच. 

दरम्यान, सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत लतिका आणि अभि मिळून गणरायाची स्थापना करणार आहेत. अभिलाषा अभिमन्यूच्या विरोधात काही तरी कट कारस्थान करताना दिसणार आहे. आता हे आलेलं विघ्न कसं दूर होईल ? काय आहे नक्की अभिलाषाच्या मनामध्ये ? हे मालिकेमध्ये बघायला मिळेल.  
 

Web Title: marathi tv serial celebrate ganesh chaturthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.