अशिक्षित राया होणार कृष्णाचा लेखनिक; CA च्या परिक्षेचा पेपर लिहून करणार बायकोचं स्वप्न पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 04:45 PM2022-01-18T16:45:22+5:302022-01-18T16:45:53+5:30

Man Jhala Bajind: उजव्या हात निकामी झाल्यामुळे कृष्णाला पेपर देणं कठीण झालं आहे. इतकंच नाही तर कमी वेळात तिला लेखनिकदेखील मिळत नसल्यामुळे ती टेन्शनमध्ये आली आहे.

marathi tv serial Man Jhala Bajind krishan ca exam | अशिक्षित राया होणार कृष्णाचा लेखनिक; CA च्या परिक्षेचा पेपर लिहून करणार बायकोचं स्वप्न पूर्ण

अशिक्षित राया होणार कृष्णाचा लेखनिक; CA च्या परिक्षेचा पेपर लिहून करणार बायकोचं स्वप्न पूर्ण

googlenewsNext

'मन झालं बाजिंद' ही मालिका सध्या चांगल्याच रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. सुरुवातीच्या काळात एकमेकांचा चेहरादेखील पाहणं पसंत न करणारे राया आणि कृष्णा एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. त्यामुळे दोघंही संकटाच्या काळात एकमेकांची साथ देत असतात. अलिकडेच कृष्णाला फॅक्ट्रीत शॉक बसल्यामुळे तिचा  उजवा हात निकामी झाला आहे. त्यामुळे तिला CA परीक्षा देणं अवघड होणार आहे. परंतु, तिच्या या अडचणीत राया तिला साथ देणार आहे.

काही दिवसांपूर्वीच फॅक्ट्रीमधील नवीन मशीनचं उद्घाटन करतांना कृष्णाला जबर शॉक लागतो. ज्यामुळे तिचा उजवा हात निकामी होतो. कृष्णाच्या उजव्या हाताची जराही हालचाल होत नसल्यामुळे सध्या तिला अनेक संकटांना सामोरं जाव लागत आहे. परंतु, प्रत्येक पावलापावलावर तिला राया साथ देत आहे. यामध्येच आता कृष्णाची CA परीक्षा येऊ घातली आहे. परंतु, उजव्या हात निकामी झाल्यामुळे कृष्णाला पेपर देणं कठीण झालं आहे. इतकंच नाही तर कमी वेळात तिला लेखनिकदेखील मिळत नसल्यामुळे ती टेन्शनमध्ये आली आहे.

दरम्यान, कृष्णाची होत असलेली घालमेल आणि दु:ख लक्षात घेऊन राया तिच्या मदतीसाठी पुढे आला आहे. तुझ्या परीक्षेत मी तुझा लेखनिक होऊन पेपर सोडवतो असं राया म्हणतो. त्यामुळे कृष्णाचं खूप मोठं टेन्शन दूर होणार आहे. परंतु, राया अशिक्षित असल्यामुळे तो कसा काय कृष्णाला पेपर सोडवायला मदत करणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे आता ऐन परिक्षेच्या वेळी काय होतं?, राया खरंच हा पेपर लिहू शकेल का? अशा प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत. 
 

Web Title: marathi tv serial Man Jhala Bajind krishan ca exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.