मालतीसमोर येणार इंद्रा-दिपूचं प्रेम प्रकरण; मालिकेत पुन्हा नवा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 14:49 IST2022-04-14T14:48:48+5:302022-04-14T14:49:08+5:30
Man udu udu zal: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये इंद्रा आणि दिपू एकमेकांशी बोलत असताना मालती त्यांना रंगेहात पकडते.

मालतीसमोर येणार इंद्रा-दिपूचं प्रेम प्रकरण; मालिकेत पुन्हा नवा ट्विस्ट
छोट्या पडद्यावर सध्या विशेष गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे 'मन उडू उडू झालं' (man udu udu zal). या मालिकेत एकीकडे दिपू आणि इंद्रा यांचं प्रेम खुलत आहे. तर दुसरीकडे मात्र, त्यांच्या नात्यात सतत काही ना काही अडचणी येत आहेत. यामध्येच आता या दोघांचं प्रेम प्रकरण दिपूच्या आईला म्हणजेच मालतीला कळणार आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये इंद्रा आणि दिपू एकमेकांशी बोलत असताना मालती त्यांना रंगेहात पकडते. त्यामुळे मालतीसाठी हा मोठा धक्का बसणार आहे.
दरम्यान, सानिकाच्या प्रेम प्रकरणामुळे देशपांडे सर आणि मालती आधीच खचून गेले आहेत. या परिस्थितीतून ते सावरत असतानाच मालतीसमोर दिपू-इंद्राचं सत्य येणार आहे. मुळात देशपांडे सर आणि मालती यांचा दिपू-इंद्रावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे ते या दोघांच्या प्रेमाचा स्वीकार करतील का? दिपू-इंद्राचं प्रेम कायम राहिल का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.