लग्न मोडल्यानंतर यशच्या 'या' कृतीमुळे पहिल्यांदा हसली नेहा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 07:31 PM2021-12-28T19:31:14+5:302021-12-28T19:33:22+5:30

Mazi tuzi reshimgaath: यश, नेहाला हसवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. आणि, अखेर त्याचे हे प्रयत्न पाहून नेहाला हसू येतं.

marathi tv serial mazi tuzi reshimgaath yash and pari try to make smile on neha face | लग्न मोडल्यानंतर यशच्या 'या' कृतीमुळे पहिल्यांदा हसली नेहा

लग्न मोडल्यानंतर यशच्या 'या' कृतीमुळे पहिल्यांदा हसली नेहा

googlenewsNext

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत सध्या नेहाच्या आयुष्यात अनेक चढउतार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. परीच्या भविष्याचा विचार करुन नेहा लग्नासाठी तयार झाली होती. मात्र, ऐन लग्नात परांजपे वकील त्यांच्या स्वार्थासाठी हे लग्न करत असल्याचं नेहाच्या समोर आलं. त्यामुळे भर मांडवात हे लग्न मोडतं. परंतु, या घटनेनंतर नेहा एकदम कोसळून जाते. ज्यामुळे ती खिन्न झाल्याचं पाहायला मिळतं. याच दु:खातून तिला बाहेर काढण्यासाठी यश कसोशीने प्रयत्न करत असल्याचं लवकरच पाहायला मिळणार आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे.  या प्रोमोमध्ये यश, नेहाला हसवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. आणि, अखेर त्याचे हे प्रयत्न पाहून नेहाला हसू येतं.

नेहा उदास असल्यामुळे परी, यशला फोन करुन घरातील वातावरणाचा अंदाज देते. त्यानंतर, यश वेगवेगळ्या प्रकारे नेहाला हसवायचा प्रयत्न करतो. यात तो शेफाली, काका-काकू, शेजारचे या सगळ्यांची मदत घेतो. मात्र, नेहावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. अखेर यश स्वत: तिला हसवायचा प्रयत्न करतो आणि तो यशस्वी होतो.

दरम्यान, यशचं नेहावर प्रेम असल्याचं त्याला जाणवलं आहे. त्यामुळे लवकरच तो तिच्यासमोर आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे. सोबतच तो ५०० कोटींच्या कंपनीचा मालक असल्याचंही सांगणार आहे. मात्र, तो ही कबुली देण्यापूर्वीच परांजपे वकील त्याच सत्य समोर आणणार आहेत. त्यामुळे आता पुढच्या टप्प्यावर ही मालिका अधिकच रंजक होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.
 

Web Title: marathi tv serial mazi tuzi reshimgaath yash and pari try to make smile on neha face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.