पॅलेसमध्ये होणार बंडू काकांचा अपमान; संतापलेली नेहा सिम्मीला घडवणार अद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 15:22 IST2022-04-28T15:21:47+5:302022-04-28T15:22:14+5:30
Mazi tuzi reshimgath: सिम्मी जाणूनबुजून बंडू काकांचा अपमान करणार आहे. जे पाहून नेहाचा संयम सुटतो आणि ती सिम्मीला खडे बोल सुनावते.

पॅलेसमध्ये होणार बंडू काकांचा अपमान; संतापलेली नेहा सिम्मीला घडवणार अद्दल
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येताना दिसत आहेत. यात लग्नापूर्वीच नेहा आणि यश नवरा-बायकोप्रमाणे पॅलेसमध्ये राहू लागले आहेत. यात नेहाच्या पाठोपाठ पॅलेसमध्ये परी आणि काका-काकूदेखील राहायला आले आहेत. त्यामुळे सध्या या मालिकेत अनेक रंजक घटना घडताना दिसत आहेत. यामध्येच आता सिम्मी जाणूनबुजून बंडू काकांचा अपमान करणार आहे. जे पाहून नेहाचा संयम सुटतो आणि ती सिम्मीला खडे बोल सुनावते.
सध्या सोशल मी़डियावर माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये बंडू काकांच्या विसरभोळेपणाचा फायदा घेत सिम्मी त्यांची खिल्ली उडवते. ती चक्क त्यांच्या अंगावर काही मजकूर लिहिते. हा प्रकार नेहाच्या कानावर पडतो आणि ती प्रचंड संतापते. इतकंच नाही तर ती सिम्मीलादेखील खडे बोल सुनावते.
दरम्यान, प्रचंड संतापलेल्या नेहाने बंडू काका-काकूंसह पॅलेसमधून बाहेर पडायचा निर्णय घेते. यात यशदेखील तिला नेमकं काय झालं विचारायचा प्रयत्न करते. मात्र, त्याच्याशीही काहीही न बोलता ती थेट पॅलेसमधून बाहेर पडते. आता सिम्मीचा हा प्रकार यशच्या कानावर पडल्यानंतर काय होणार? नेहा पुन्हा पॅलेसमध्ये येणार का? सिम्मी बंडू काकांची माफी मागणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहे.