नेहाला सत्य सांगायच्या नादात यशची होणार फजिती; Video पाहून होईल हसू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 04:31 PM2022-01-07T16:31:02+5:302022-01-07T16:31:58+5:30

Mazi tuzi reshimgath: नेहाने यशसोबत मैत्री तोडली आहे. तसंच परी आणि काका-काकूंनादेखील त्याच्याशी कोणताही संबंध ठेऊ नका असं खडसावून सांगितलं आहे.

marathi tv serial mazi tuzi reshimgath neha and yash conversation | नेहाला सत्य सांगायच्या नादात यशची होणार फजिती; Video पाहून होईल हसू अनावर

नेहाला सत्य सांगायच्या नादात यशची होणार फजिती; Video पाहून होईल हसू अनावर

googlenewsNext

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत सध्या यश आणि नेहा यांच्यात मोठा गैरसमज निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यशचं सत्य समोर आल्यानंतर नेहा पार खचून गेली आहे. काही दिवसांपूर्वीच परांजपे वकिलांनी तिची फसवणूक केली होती. त्यामुळे हा धक्क्यातून ती सावरत नाही. तोच तिच्यावर यशचं सत्य समजल्यावर दुसरा आघात झाला. त्यामुळेच आता नेहाने नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.  परंतु, आता यश नेहाची समजूत काढणार आहे. या सगळ्यामध्ये यशची एक चांगलीच फजिती होणार आहे.

यशने केलेली फसवणूक लक्षात आल्यानंतर नेहा तिच्या नोकरीचा राजीनामा देते. इतकंच नाही तर यशदेखील तिचा राजीनामा स्वीकारतो. परंतु, नेहाला दोन महिने नोटीस पिरिअड द्यावा लागणार असल्यामुळे या काळात यश तिला सत्य सांगायचा प्रयत्न करणार आहे.

 झी मराठीने अलिकडेच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये यश, नेहाला लिफ्टमध्ये गाठतो आणि तिच्यासमोर त्याची बाजू मांडायचा प्रयत्न करतो. परंतु, यामध्येच लिफ्टमध्ये एक स्त्री येते आणि त्याचवेळी लिफ्टदेखील बंद पडते. त्यामुळे लिफ्टमध्ये चढलेली महिला जोरजोरात आरडाओरडा करायला लागते. या कारणास्तव पुन्हा यशचा नेहासोबत बोलण्याचा प्रयत्न अपयशी ठरतो आणि त्याची फजिती होते. 

दरम्यान, नेहाने यशसोबत मैत्री तोडली आहे. तसंच परी आणि काका-काकूंनादेखील त्याच्याशी कोणताही संबंध ठेऊ नका असं खडसावून सांगितलं आहे. इतकंच काय तर नेहाच्या अशा वागण्याचा परिणाम परीवरही झाल्याचं पाहायला मिळालं. यशसोबत बोलणं होत नसल्यामुळे परीला ताप भरल्याचं पाहायला मिळालं होतं.
 

Web Title: marathi tv serial mazi tuzi reshimgath neha and yash conversation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.